SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईल हरवल्यास असे बंद करा पेटीएम खाते.. सोप्या टिप्स फाॅलो करा..

सध्या स्मार्टफोन जीवनाश्यक बाब बनली आहे.. त्यात आपण केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर त्याद्वारे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स, बँकिंगची कामेही करता येतात.. असा जीव की प्राण असणारा हा स्मार्टफोन हरवला तर…?

स्मार्टफोन हरवल्यास अनेकांचा जीव कासावीस होतो… त्यातील महत्वाच्या कागदपत्रांचा, अ‍ॅपचा गैरवापर होण्याची भीती असते.. ऑनलाइन पेमेंटसाठी अनेकांच्या फोनमध्ये पेटीएम (Paytm) सारखे अ‍ॅप असते. त्याचा चुकीचा वापर होण्याची भीती असते.

Advertisement

…पण स्मार्टफोन हरवला, तरी काळजी करु नका.. काही सोप्या टीप्स फॉलो करुन तुम्ही पेटीएम खाते चोराकडून अनलॉक होण्यापासून वाचवू शकता. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या…

‘पेटीएम’ कसे बंद करणार..?
पेटीएम खाते बंद करण्यासाठी अनेक पद्धती आहे. तुम्ही रिमोटली डिजिटल पेमेंट अकाउंटला रिमूव्ह किंवा ब्लॉक करू शकता.
– पेटीएम युजर्स सहज सर्व डिव्हाइसमधून अकाउंट लॉग आउट करू शकतात. मात्र, त्यासाठी अकाउंटचा पासवर्ड नि रजिस्टर्ड मोबाइल नंबर माहित असायला हवा..

Advertisement

– सर्वप्रथम पेटीएम अ‍ॅप दुसऱ्या मोबाइलवर डाउनलोड करा.
– नंतर मेन्यूमध्ये जा. वरच्या डाव्या बाजूला प्रोफाइल सेटिंग टॅबमध्ये जा.
– त्यानंतर सिक्योरिटी आणि प्रायव्हसी सेटिंगमध्ये जावं लागेल.

– त्यापुढे मॅनेज अकाउंट ऑन ऑल डिव्हाइस ऑप्शनवर क्लिक करा.
– तेथे एक मेसेज दिसेल. त्यात सर्व डिव्हाइसमधून लॉग आउट करण्यासाठी कन्फर्मेशन दिसेल. त्यावर Yes क्लिक केल्यावर तुमचे पेटीएम खाते बंद होईल.

Advertisement

हेल्पलाइन नंबरद्वारे..
पेटीएम हेल्पलाइन नंबर 01204456456 वरही तक्रार येते. येथे अनेक पर्याय मिळतील. पैकी लाॅस्ट फोन (Lost Phone) पर्याय सिलेक्ट करा. नंतर इथे दुसरा नंबर द्यावा लागेल. आवश्यक माहिती दिल्यानंतर सर्व डिव्हाइसमधून पेटीएम खाते लॉग आउट करता येईल.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement