प्रत्येकाचे आयुष्यात एक स्वप्न असते, ते म्हणजे स्वत:ची कार.. पण अगदी साधी कार घ्यायची झाली, तरी काही लाखांत पैसे लागतात. अशा मदतीसाठी येतात, त्या बॅंका..! वित्तीय संस्था वा बॅंका कार घेण्यासाठी नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज देत असतात..
कार घेण्यासाठी कर्ज घ्यायचे झाल्यास बँका (Bank) किंवा वित्तीय संस्थेकडे (Financial Institution) अर्ज करावा लागतो.. मात्र, कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँका किंवा वित्तीय संस्था कर्जदाराची पात्रता निकषांनुसार पडताळून पाहतात. निकष पूर्ण करणाऱ्याचेच कर्ज मंजूर केले जाते.
कर्ज मिळण्यासाठी नागरिकांना काही महत्वाची कागदपत्रे द्यावी लागतात. नवीन, तसेच जुनी कार घेण्यासाठीही बॅंका कर्ज देतात.. चला तर मग कर्जासाठीचे निकष नि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याबाबत जाणून घेऊ या..
कर्जासाठीचे निकष काय..?
– वाहन कर्ज घेण्यासाठी 18 ते 75 वर्षे वयाची व्यक्ती अर्ज करू शकते.
– कर्जासाठी व्यक्तीचे किमान मासिक उत्पन्न (Monthly Income) 20 हजार रुपये असायला हवे.
– नोकरी करीत असलेल्या कंपनीचे एका वर्षापासून काम करीत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
– कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती सरकारी वा खासगी कंपनीत नोकरी करणारी किंवा व्यावसायिक असायली हवी.
कर्जासाठी वरील निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीलाच बँका किंवा वित्तीय संस्था वाहनकर्ज मंजूर करतात. त्यासाठी बॅंकांमध्ये कागदपत्रेही द्यावी लागतात..
आवश्यक कागदपत्रे
– ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक ओळखपत्र असावं
– रहिवाशी पुराव्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, वीज, पाणी, दुरध्वनी बिल.
– उत्पन्नाचा पुरावा देण्यासाठी फॉर्म 16, मासिक पगाराची स्लिप, इन्कमटॅक्स रिटर्न, गेल्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
– सगळीकडे वरील कागदपत्रे मागितली जातात. मात्र, कर्जदाराच्या स्थितीनुसार कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो
– कारच्या बुकिंगच्या पावत्याही द्याव्या लागतात. त्यावरुन कर्जाची रक्कम व कारची किंमत, याची पडताळणी बॅंक करते. कार इश्युरन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्सदेखील तपासलं जातं.
सुलभ वाहनकर्जाची प्रक्रिया
बँका वा वित्तीय संस्थांसोबत बहुतांश कार डीलर्स किंवा कार उत्पादक कंपन्या सहकार्य करार करतात. त्यामुळे डिलरकडे कार खरेदीसाठी गेल्यावर गरज असल्यास तेथेच कर्ज सुविधा पुरविली जाते. त्यामुळे वाहन कर्जाची प्रक्रिया अत्यंत सुलभ व जलद झालीय.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076