SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शैक्षणिक कर्ज घायचंय? ‘या’ बँका देतील कमी व्याजदरात कर्ज, कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा..

शिक्षण म्हणजे आपल्या प्रगतीचा पाया आहे. उच्च शिक्षण घ्यायचं असलं की पैसे लागतातच. वैद्यकीय असो की अभियांत्रिकी किंवा अशा काही इतर अभ्यासक्रमांचा खर्च मोठा असल्यानं अनेक मुलांच्या आई वडिलांना तो परवडत नाही. पण मग स्वप्न बाजूला ठेवून दुसऱ्या अभ्यासक्रमाची निवड करण्यापेक्षा शैक्षणिक कर्ज तुम्ही घेण्याचा पर्याय आहे. यामुळे तुमचं करिअर अधिक उत्तम प्रकारे तुम्ही घडवू शकता. देशातल्या अनेक आघाडीच्या बँका शैक्षणिक कर्ज देतात.

शैक्षणिक कर्ज घेताना त्याची निवड कशी करावी?

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): स्टेट बॅंकेकडून मुलींसाठी अधिक सवलतीच्या दरात 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. कर्जाचा कमाल कालावधी 15 वर्षे असू शकतो. बँकेतून कर्ज घेताना तुम्ही व्याजदरही विचारून घ्यावा. उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसरं कर्ज मिळू शकतं.

ॲक्सिस बँक (Axis Bank): बँकेची कर्जाची कमाल रक्कम 1 कोटी रुपये आहे. कर्जाचा कमाल कालावधी 15 वर्षे असेल. बँकेला तुमचा संपूर्ण अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 15 व्यावसायिक दिवसांच्या आत कर्जवाटप होतं. काम करत शिक्षण घेणाऱ्यांसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

Advertisement

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda): कर्जाची कमाल रक्कम रु. 80 लाख पर्यंत आहे. कर्जाचा कमाल कालावधी 10-15 वर्षे आहे. जामीन : 100% मूर्त. सुरक्षा मार्जिन : 4 लाखांपर्यंत शून्य. नर्सरीपासून शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. निवडक शैक्षणिक कर्ज योजनांवर फ्री डेबिट कार्ड मिळेल आणि विद्यार्थिनींसाठी सवलतीचे व्याजदर आहेत.

एचडीएफसी बँक (HDFC bank): कर्जाची कमाल रक्कम भारतात शिक्षण घेण्यासाठी 20 लाख, तर परदेशात शिक्षणासाठी 35 लाख रुपये आहे. जामीनदार असल्यास कर्जाला मर्यादा नाही. कर्जाचा कमाल कालावधी 15 वर्षे आहे. जामीन : 7.5 लाखांपर्यंत शून्य. उच्च श्रेणीतली महाविद्यालयं आणि विद्यापीठांनुसार व्याजाचा दर परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जामध्ये 36 देशांमधल्या 950 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांसाठी कर्ज दिलं जातं. वेगळ्या शहरातला सह-कर्जदार चालू शकतो.

Advertisement

टाटा कॅपिटल शैक्षणिक कर्ज (TATA capital): कर्जाची कमाल रक्कम : रु. 30 लाख रुपये आहे. कर्जाची कमाल मुदत : 6 वर्षं असेल. जामीन : 4 लाखांपर्यंत शून्य. तुमच्या सोयीनुसार 3 कर्ज हप्त्यांचे पर्याय उपलब्ध किमान कागदपत्रं आणि कर्जाची लवकर मंजुरी.

या आणि इतर काही बँका आणि वित्तीय संस्थांकडून तुम्ही कर्ज घेण्याचं ठरवलं असेल, तर कर्ज, व्याजदर, अन्य अटी याची माहिती घेऊन तुम्हाला योग्य वाटेल अशा ठिकाणाहून शैक्षणिक कर्ज घेऊ शकता आणि तुमच्या मुलांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करू शकता.

Advertisement

शैक्षणिक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे?

▪️ वयाचा पुरावा (Age proof)
▪️ पासपोर्ट साइज फोटो (Passport size photograph)
▪️ मार्कशीट (Marksheet)
▪️बँक पासबुक (Bank passbook)
▪️ आईडी प्रूफ (ID proof)
▪️ॲड्रेस प्रूफ (Address proof)
▪️ कोर्स डिटेल्स (Course details)
▪️ विद्यार्थी आणि पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड (Parents and Student’s PAN card and Aadhar card)
▪️पालकांचा उत्पन्नाचा दाखला (Parents income proof)

Advertisement

(नोंद घ्या: वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे, शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी बँकेनुसार अटींची पूर्तता करणे गरजेचे असते. तशी आपण खात्रीसाठी बँकेला नक्की भेट द्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076

Advertisement