SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कृषीपंप विजबिलाच्या थकबाकीत मिळणार 50 टक्के सूट?

महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील वीजबिल थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

निर्णयात काय?

Advertisement

शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम एकरकमी भरली, तर त्यांना त्या थकबाकीमध्ये 50 टक्के सूट देण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

तसेच, नवीन कृषीपंपांसाठी कनेक्शन देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. मंत्री तनपुरे यांनी म्हटलं की, राज्यामधील कृषीपंपधारक शेतकऱ्यांजवळ अंदाजे 40 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी ही सवलत योजना शासनामार्फत लागू केली गेली आहे.

Advertisement

या योजनेतील माहीतीनुसार, मागील 5 वर्षामधील विलंब आकारणी शुल्क रद्द केले जाणार आहे, तसेच थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी दिली जाणार आहे. तसेच या नवीन योजनेनुसार सर्व कृषीपंप ग्राहकांना येत्या 3 वर्षामध्ये हळूहळू टप्प्याने येथून पुढे दररोज 8 तास वीज पुरवठा नेहमी करण्यात येईल.

आता सध्या कार्यरत असलेल्या सर्व कृषिपंपांना कॅपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधा करण्यासाठी शासनामार्फत दरवर्षी 1500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यानुसार 2024 वर्षाखेर भाग भांडवल स्वरूपात निधी महावितरण कंपनीला देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी एक लाख सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत, अशी माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076

Advertisement