SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास 50 हजारांची मदत, ठाकरे सरकारची मोठी घोषणा..

कोरोना संकटाने गेले दीड वर्ष अख्खे जग वेठीस धरले होते. या महामारीत कोणी आई-वडील गमावले, तर कोणी भाऊ, कोणी बायको, तर कोणी मुले.. अनेक जण अनाथ झाले.. अनेकाच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला.. काही तर अगदी रस्त्यावर आले..

आता कोरोनातून जग सावरतेय.. देश, राज्य सावरतेय.. कोरोनाची भीती गेलेली नसली, तरी सारे व्यवहार सुरळीत होताहेत. अशा वेळी कोरोनात अनाथ झालेल्या लोकांसाठी ठाकरे सरकारने मदतीचा हात दिला आहे.. अशा कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय..

Advertisement

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 50 हजार रुपये देण्यात येणार असून, राज्य सरकारने तसा ‘जीआर’ काढला आहे. राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे ही मदत केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनात सर्वस्व हिरावलेल्या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे…

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात ही मदत दिली जाणार आहे. ही मदत मिळविण्यासाठी  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

Advertisement

कोणाला मिळणार मदत..?

  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास 50,000 रुपयांची मदत राज्य आपत्ती मदत निधीतून दिली जाणार आहे.
  • रुग्णालयात क्लिनिकल डायग्नोसीस (Clinical diagnosis)च्या तारखेपासून 30 दिवसांत मृत्यू झालेला असल्यास, तसेच हा मृत्यू रुग्णालयाबाहेर झाला असेल अथवा कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केलेली असली, तरी ही मदत मिळणार आहे.
  • कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयात दाखल केल्यावर 30 दिवसांनंतर मृत्यू झाला असेल, तरी मदत मिळेल.
  • मृताच्या प्रमाणपत्रावर ‘कोव्हिड-19 मुळे मृत्यू’ अशी नोंद नसली, मात्र तरीही अटीची पूर्तता होत असल्यास, 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे..

कुठे, कसा अर्ज करायचा..?
नागरिकांना मदत करण्यासाठी राज्य शासन वेबसाईट विकसीत करणार आहे. त्याची माहिती लवकरच दिली जाईल. या वेब पोर्टलवर मृताच्या नातेवाईकांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तसेच अर्जदार स्वत: सेतू किंवा ग्रामपंचायतीत ‘सीएससी-एसपीव्ही’ (CSC-SPV) मधून अर्ज करु शकतात..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076

Advertisement