SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु होणार.., ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!

अखेर राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन सुरु करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागात पहिली ते चौथी, तर शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

दरम्यान, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय तूर्त ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ बाबत खबरदारीचे उपाय व ‘एसओपी’ लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

राज्याच्या कोविड टाक्स फोर्सनेही पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून पालकही आता शाळा सुरु करण्याची मागणी करीत होते. त्यानुसार राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले..

Advertisement

दरम्यान, याआधी पाचवीपासूनचे वर्ग सुरू केले होते. आता पहिली ते चौथीचे वर्गही सुरू होणार असल्याने आता राज्यातील सरसकट शाळा सुरु होणार आहेत.

पहिली ते चौथीच्या वर्गातील मुले लहान असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबतची काळजी प्रामुख्याने शाळांनी घ्यायची आहे. शिक्षक, मुख्याध्यापक नि शालेय प्रशासनाला याबाबतचे आदेश दिले जाणार आहेत. यासंदर्भात आवश्यक नियमावली लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले..

Advertisement

याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, की “ग्रामीण भागात ५वी ते १२वी, तर शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरु झालेले आहेत. आता ग्रामीण भागात पहिली ते चौथी, तसेच शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..”

त्या म्हणाल्या, की “पहिलीतील मूले अद्याप शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात येईल. सर्व मुलांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात येईल.”

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076

Advertisement