SpreadIt News | Digital Newspaper

इंधन दरवाढीनंतर आता विजही महागणार..? केंद्र सरकार मांडणार नवीन वीजबिल विधेयक..

महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.. कारण, जनतेच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. कारण, इंधन दरवाढीनंतर आता विजेसाठीही नागरिकांना अधिक झळ सोसावी लागणार आहे.

सध्या विजेची मागणी नि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. वाढत्या वीजटंचाईमुळे अनेक खेड्यांमध्ये आजही आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा खंडित केला जातो. दुसरीकडे फुकट वीज वापरणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.  या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मोदी सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत.

Advertisement

मोदी सरकारचे हिवाळी अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकार नवीन वीजबिल विधेयक मांडणार आहे. त्याचा देशातील जनतेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊ या…

वीजबिल विधेयकाचा काय परिणाम होणार..?
मोदी सरकारच्या नवीन वीजबिल विधेयकाची सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे, सरकार आता वीज कंपन्यांना अनुदान देणे बंद करणार आहेत. वीज कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी ते थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाणार आहे..

Advertisement

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाच्या धर्तीवर आता विजेसाठी अनुदान मिळणार आहे. तसेच ठराविक बिलापर्यंत मोफत विजेची सवलतही आता बंद होईल.. कदाचित ठरावीक वर्गासाठीच सरकार अनुदान देऊ शकतं. मात्र, त्यामुळे आता विजेचे दर वाढण्याची शक्यता आहे.

आता राज्य सरकारे नागरिकांना मोफत वीज देऊ शकणार नाहीत. सध्या वीज वितरक कंपन्यांना राज्य सरकारे आगाऊ अनुदान (Subsidy) देतात. या अनुदानाच्या आधारे कंपन्या विजेचे दर ठरवितात. आता वीज कंपन्यांना अनुदानच मिळणार नसल्याने वीजदरात वाढ होणे अटळ आहे…

Advertisement

हे प्रश्न अनुत्तरितच…

  • आता थेट ग्राहकाच्या खात्यात अनुदान येणार आहे.. पण भाडेकरूच्या बाबतीत काय..? कारण, हे अनुदान वीजबिल घरमालक, जमीन वा दुकानाच्या मालकाच्या नावावर येणार…
  • अनुदानास विलंब झाल्यास ग्राहकांवर आर्थिक बोजा वाढणार..
  • ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मीटरशिवाय वीज दिली जाते, तेथे वीजबिल आकारणी कशी करणार..?

वीज वितरण कंपन्या आताच 50,000 कोटी रुपये तोट्यात आहेत.. या कंपन्यांचे डिस्कॉमकडे (Discom) ९५ हजार कोटी देणी बाकी आहे. ‘डिस्कॉम’ला अनुदान मिळण्यास विलंब होत असल्याने, वीज वितरण कंपन्या अडचणीत आल्या आहेत.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076

Advertisement