‘द कपील शर्मा..’ छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय विनोदी शो..! या कार्यक्रमात येण्यासाठी दिग्गज नेते-अभिनेते, खेळाडू उत्सुक असतात. शोमध्ये पोट दुखेस्तोवर हसतात. मात्र, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तेथे वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले.
एके काळी छोट्या पडद्यावरसर्वांची लाडकी सून साकारणाऱ्या व सध्याच्या केंद्रिय मंत्री स्मृती इराणी या नुकत्याच त्यांच्या ‘लाल सलाम’ पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावणार होत्या.. त्यानुसार त्या वेळेवर शुटिंगसाठीही पोचल्या..
स्मृती इराणी यांच्यासोबत चालक व इतर दोन जण उपस्थित होते.. मात्र, गेटवरील सुरक्षा रक्षकाने त्यांना ओळखले नाही. सेटच्या प्रवेशद्वाराजवळच सुरक्षा रक्षकाने त्यांची गाडी अडवली. शुटिंगसाठी त्यांना आत सोडण्यास त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला.
सुरक्षारक्षक व चालकांत वाद
इराणी यांच्या गाडीचा चालक व सुरक्षारक्षकामध्ये बराच वेळ वाद सुरु होता. चालकाने आम्हाला शुटिंगसाठी बोलविल्याचे सांगितलं. मात्र, आपल्याला अशी कोणतीही गाडी आत सोडण्याबाबत सूचना मिळालेली नाही. त्यामुळे मी आत गाडी सोडू शकत नसल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले.
दरम्यान, हा वाद सुरु असतानाच तेथे फूड डिलेव्हरी करण्यासाठी एक जण आला. मात्र, त्याची कोणतीही चौकशी न करता सुरक्षा रक्षकाने त्याला आत सोडले. फूड डिलेव्हरी बॉयला आत सोडले जात असताना, आपल्यालाच अपमानस्पद वागणूक दिली जात असल्याचे स्मृती इराणी यांना वाटलं..
स्मृती इराणी निर्णयावर ठाम..
अखेर संतापलेल्या स्मृती इराणी यांनी शुटिंग न करताच, तेथून माघारी परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, याबाबत कपिल शर्मा व प्रोडक्शन हाऊसला काहीच कल्पना नव्हती.. याबाबत माहिती मिळताच त्यांनी स्मृती इराणी यांची माफी मागत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
मात्र, चिडलेल्या स्मृती इराणी यांनी शूटिंग न करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. त्यानंतर सुरक्षा रक्षकालाही आपली चूकी समजली. आपण एका केंद्रीय मंत्र्यांना गेटवर थांबवलं व नंतर मोठा गोंधळ झाल्याने भीतीपोटी त्याने आपला फोन ‘स्वीच ऑफ’ केला होता..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306076