SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भरदिवसा पतसंस्थेवर दरोडा, पुण्यातील जुन्नरमधील पाहा हा धक्कादायक व्हिडीओ..

राज्यात सध्या सातत्यानं दरोड्याच्या घटना घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची परिस्थिती सध्या दरोड्यांमुळं निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शिरूर येथे महाराष्ट्र बॅंकेवर दरोडा टाकण्यात आला होता. आता जुन्नर तालुक्यात एक सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे.
वाचा सविस्तर प्रकरण…
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील 14 नंबर येथे 24 नोव्हेंबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका पतसंस्थेत सशस्त्र दरोडा (Armed robbery) टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी हातात शस्त्र घेऊन अनंत पतसंस्थेवर दरोडा टाकला आहे. दरम्यान बॅंकेतील उपस्थित नागरिकांना प्रतिकार करायला सुद्धा करायचा वेळ मिळाला नाही.
या दरोड्यात 2 लाख 50 हजार रूपये रक्कम लुटण्यात आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर 14 नंबर येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन हेल्मेट घालून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश करून 2 लाख 50 हजारांची रक्कम घेऊन पोबारा केला.
दरोडेखोरांच्या हल्ल्याला प्रतिकार करत असताना बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत  यांना दरोडेखोरांना गोळी घालण्यात आली. यामध्ये भोर यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेत असताना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. यावेळी बॅंकेत महिलादेखील उपस्थित होत्या.
पोलिसांना या घटनेचा सुगावा लागल्यानंतर तात्काळ डॉग स्क्वाड तेथे पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती घेत पंचनामा करण्यात आला. अशाप्रकारे भर दिवसा दरोडा पडल्याने नागरिकांमध्येही आता भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. आळेफाटा आणि नारायणगाव पोलीस स्थानकातील पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले होते.
दरोडेखोरांनी हल्ला केल्याचा व्हिडीओही आला समोर,  व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👉 https://twitter.com/i/status/1463454530041880578
चोरट्यांनी अडीच लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत घटनास्थळी पुढील तपास चालू आहे. दरम्यान, जुन्नर भागाच्या जवळील सर्व पोलीस स्थानकांना या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे. पतसंस्थेच्या व्यवस्थापकांच्या मृत्यूने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडणं गरजेचं आहे, असं आवाहन समस्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511