SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एअरटेल कंपनीच्या रिचार्ज दरवाढीनंतर तुमच्या फायद्याचा रिचार्ज कोणता? तुम्हीच वाचा..

देशातील असंख्य वापरकर्ते असलेल्या एअरटेल कंपनीने प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केल्याची घोषणा केल्यावर विविध प्लॅन्सच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या होत्या. हे एअरटेलचे अनेक अमर्यादित व्हॉईस किंवा डेटा प्लॅन्स रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि व्होडाफोन-आयडियाच्या (Vi) प्रतिस्पर्ध्यांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा स्वस्त आहेत की महाग जाणून घ्या काही प्लॅन्सच्या किंमतीतील फरक..

28 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग प्लॅन्स:

Advertisement

एअरटेलचा बेसिक अमर्यादित कॉलिंग प्लॅन(Unlimited Calling & Data Plan) आता 179 रुपयांपासून सुरू होतो आणि दररोज 1 जिबी डेटासह 100 SMS देखील ऑफर करतो. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 1.5 जिबी डेटा आणि 359 रुपयांमध्ये, तुम्हाला 2 जिबी डेटा रोज मिळून सारखेच फायदे प्राप्त होतात.

जिओ 149 रुपयांचा प्लॅन (24 दिवस) ऑफर करते यामध्ये दिवसाला अमर्यादित कॉलिंग 100 एसएमएस (SMS) आणि दररोज 1 जिबी डेटा यांचा समावेश आहे. 1.5 जिबी डेटा प्रतिदिन प्लॅनची ​​(28 दिवस) किंमत 199 रुपये आहे, तर 2 जिबी डेटा प्रतिदिन प्लॅनची ​​किंमत 249 रुपये आहे. 349 रुपयांचा पॅक (Recharge Plans) देखील आहे जो 28 दिवसांसाठी दररोज 3 जिबी डेटा ऑफर (Data Offer) करतो.

Advertisement

व्होडाफोन आयडियाकडे येत असताना, 1 जिबी डेटा प्रतिदिन (24 दिवस) योजना 219 रुपयांपासून सुरू होते आणि अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन येतो. 1.5 जिबी डेटा प्रतिदिन प्लॅन (28 दिवस) 249 रुपये, 3 जिबी डेटा प्रतिदिन (28 दिवस) प्लॅनची ​​किंमत 501 रुपये आणि 4 जिबी डेटा प्रति दिन प्लॅनची ​​किंमत 299 रुपये आहे.

56 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग प्लॅन्स:

Advertisement

एयरटेल 56 दिवस किंवा 2 महिन्यांसाठी 2 अमर्यादित प्लॅन्स ऑफर करते. तुम्हाला 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जिबी डेटा मिळतो तर 549 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जिबी डेटाचा (2 GB data) लाभ मिळतो. दोन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस यांचा समावेश आहे.

जिओसह, तुमच्याकडे 399 रुपयांचे 1.5 जिबी डेटा प्रतिदिन आणि 666 रुपयांचे 2 जिबी डेटा प्रतिदिन प्लॅन आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये पुन्हा अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस (Daily 100 SMS) समाविष्ट आहेत.

Advertisement

व्होडाफोन आयडियासोबत तुमच्याकडे 399 रुपयांचा 1.5 जिबी प्रतिदिन आणि 449 रुपयांचा 4 जिबी प्रतिदिन प्लॅन आहे. 701 रुपयांचा प्लॅन देखील आहे, जो दररोज 3 जिबी डेटा ऑफर करतो आणि Disney+ Hotstar ची एक वर्षाची सदस्यता आणि अतिरिक्त 32 जिबी ऑफर करतो.

84 दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग प्लॅन्स:

Advertisement

एअरटेल 84 दिवसांसाठी तीन प्लॅन ऑफर करते. 455 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 6 जिबी डेटा मिळतो, 719 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रतिदिवस 1.5 जिबी डेटा आणि 839 रुपयांचा प्लॅन जो दररोज 2 जिबी डेटा ऑफर करतो.

जिओ 555 रुपयांमध्ये दररोज 1.5 जिबी डेटा, 888 रुपयांमध्ये 2जिबी डेटा आणि 999 रुपयांमध्ये दररोज 3जिबी डेटा ऑफर करते.

Advertisement

व्होडाफोन-आयडिया कंपनी 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5 जिबी डेटा, 901 रुपयांमध्ये 3 जिबी डेटा आणि 699 रुपयांमध्ये दररोज 4 जिबी डेटा देते. 379 रुपयांमध्ये एकूण 6 जिबी डेटा प्लॅन (Data Plan) देत आहे.

डेटा प्लॅनबद्दलही जाणून घ्या..

Advertisement

एयरटेल (Airtel) कंपनीच्या डेटा बूस्टर प्लॅनसाठी 3 जिबीसाठी 58 रुपये, 12 जिबीसाठी 118 रुपये व 50 जिबीसाठी 301 रुपये , सर्व प्लॅन अमर्याद वैधतेसह उपलब्ध करण्यात आले आहे.

यासोबतच, रिलायन्स जिओ कंपनी 11 रुपयांमध्ये 1 जिबी डेटा, 21 रुपयांमध्ये 2 जिबी डेटा, 51 रुपयांमध्ये 6 जिबी डेटा आणि 101 रुपयांमध्ये 12 जिबी डेटा ऑफर करते. 30 दिवसांच्या वैधतेसह ‘वर्क फ्रॉम होम’ डेटा बूस्टर प्लॅनदेखील आहेत ज्यांची किंमत 30 जिबीसाठी रुपये 151, 40 जिबी साठी 201 रुपये आणि 50 जिबीसाठी रुपये 251 आहे.

Advertisement

व्होडाफोन-आयडिया (Vodafone-idea) 24 तासांच्या वैधतेसह 16 रुपयांमध्ये 1 जिबी डेटा, 28 दिवसांच्या वैधतेसह 48 रुपयांमध्ये 3 जिबी डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह 98 रुपयांमध्ये 12 जिबी डेटा ऑफर करते. ग्राहकांसाठी 351 रुपयांचा प्लॅन देखील आहे ज्यात 56 दिवसांसाठी 100 जिबी डेटा मिळतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement