SpreadIt News | Digital Newspaper

पगारवाढीच्या घोषणेनंतरही एसटी संपाचा तिढा कायम..! कर्मचारी काय म्हणतात, वाचा..?

एसटी संपाचा तिढा सोडण्यासाठी ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांना घसघशीत अंतरिम पगारवाढ करण्याची घोषणा केली. मात्र, त्यावर कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या आपल्या प्रमुख मागणीवर कर्मचारी ठाम होते..

परिवन मंत्री अनिल परब यांनी आज (ता. 24) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना विविध कॅटेगिरीनुसार अडीच हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत पगारवाढ करीत असल्याची घोषणा केली. शिवाय इतरही सवलती देण्याचे जाहीर केले..

Advertisement

पण, मंत्री परब यांच्या या घोषणेनंतरही एसटी कर्मचारी मागे हटण्यासाठी तयार नाहीत.. गेल्या 15 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी अद्यापही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. विलीनीकरणाशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय.

खोत-पडळकर काय म्हणाले..?
दरम्यान, मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा जाहीर केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खाेत हे आझाद मैदानावर दाखल झाले. मात्र, संपाबाबत लगेच निर्णय जाहीर न करता, त्यांनी आज रात्रभर कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या (ता. 25) सकाळी निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Advertisement

कर्मचाऱ्यांची भूमिका काय..?
एसटी कर्मचारी म्हणाले, की “राज्य सरकारने वेतनवाढीची घोषणा करुन आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. आमचा 2016 ते 2020 आणि 2020 ते 2024 असे दोन्ही करार प्रलंबित आहेत. त्यामुळे ही वेतनवाढ तर आम्हाला आपोआप मिळणारच होती. त्यामुळे हा निर्णय आम्हाला मान्य नाही.”

आभाळ फाटलं आहे आणि तुम्ही ठिगळं लावायला निघाला आहात, असं कुठं असतं का..? आमची विलिनीकरणाची प्रमुख मागणी असून, त्यावर सर्व कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे ‘जिंकू किंवा मरू’ पण आमचं युद्ध चालूच राहणार असल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Advertisement

केळं दाखवून निर्णयाचा निषेध
सोलापूर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी केळं दाखवत सरकारच्या पगारवाढीच्या निर्णयाचा निषेध केला. “एसटीच्या संपाला सोलापुरातूनच सुरुवात झाली होती. मंत्री परब यांनी केलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. आमचा मुळ मुद्दा विलीनीकरणचा आहे. ते दुसऱ्याच मुद्दावर बोलत आहेत.”

..तरंच लाल परी जगेल..!
एसटीच्या विलिनीकरणामुळे जनतेचाही फायदा होणार आहे. कारण, एसटीच्या तिकीट दरात 40 टक्क्यांची कपात होणार आहे. विलिनीकरण झालं, तरंच लाल परी जगेल, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement