SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रिकेटप्रेमींनो! ‘या’ तारखेपासून रंगणार आयपीएलचा थरार; पुढील वर्षी पहिला सामना चेन्नईत होणार?

आयपीएल 2022 चे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. पुढील वर्षी 2022 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022 Schedule) तारखा जाहीर झाल्या आहेत. जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे वेळापत्रक निश्चित झालेले नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून टी-20 लीगचा नवा हंगाम सुरू होऊ शकतो. Cricbuzz ने दिलेल्या माहीतीनुसार, आयपीएल 2022चा हंगाम 2 एप्रिलपासून सुरू होऊ शकते. बीसीसीआयने मुख्य भागधारकांना अंतर्गत माहिती दिली आहे की 2 एप्रिल पासून ही स्पर्धा सुरू होण्याची संभाव्य तारीख आहे.

पहिला सामना चेन्नईत होणार आहे. या वेळी सामने वाढल्यामुळे ही लीग 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालू शकते. 4 किंवा 5 जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे 14-14 सामने खेळावे लागणार आहेत.

Advertisement

येणाऱ्या हंगामात 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील. एकूण 60 ऐवजी 74 सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी, सर्व संघ 14-14 सामने खेळतील. आयपीएल कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी UAE मध्ये आयोजित केली गेली होती, तर यावर्षी आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये नुकताच खेळवला गेला आहे. एकीकडे बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी अलीकडेच IPL 2022 भारतात होणार असल्याचं सांगितलं आहे.

सलामीला कोण भिडणार?

Advertisement

या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना कोणत्या संघाशी होणार की पूर्वीप्रमाणेच त्याची टक्कर मुंबई इंडियन्सशी होईल का? हे अद्याप निश्चित झालेले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने सर्वाधिक वेळा टी-20 लीगचे विजेतेपद पटकावले आहे. सीएसकेने (CSK) 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल 2020 चा संपूर्ण हंगाम, तर आयपीएल 2021चा अर्धा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र बोर्डाचे सचिव जय शहा यांनी सध्याचा हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

काही महिन्यांपूर्वी आरपीएसजी ग्रुप (RPSG Group) आणि सीव्हीसी कॅपिटलनं (CVC Captital) दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींचे मालकी हक्क विकत घेतले. अहमदाबाद आणि लखनऊ हे नवीन संघ लीगमध्ये सामील झाले आहेत. आरपीएसजी ग्रुपने लखनौस्थित फ्रँचायझी 7,090 कोटी रुपयांस विकत घेतली. तर, सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझी 5,166 कोटी रुपयांना विकत घेतली. मेगा लिलाव जानेवारीमध्ये होण्याचा अंदाज असून भारत आणि न्यूझीलंड मालिकेत चाहते स्टेडियमवर येत आहेत. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा 10 संघ लीगमध्ये खेळताना दिसतील.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement