SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. कॅलक्युलेटेड रिस्क घ्या. मोठी आर्थिक गुंतवणूक नको. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.

वृषभ (Taurus) : शॉर्टकट वापरु नये. हातातील कलेला वाव द्यावा. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग शोधा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. आळस झटकून कामाला लागावे.

मिथुन (Gemini): शब्दावर विश्वास न ठेवता अनुभव यावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. दिवसाची सुरवात चांगली होईल.

कर्क (Cancer) : व्यवसाय, नोकरी बदलाचे योग. मोठा फायदा होईल. बुद्धी कौशल्याने कामे मार्गी लावावीत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

सिंह (Leo) : पद व प्रतिष्ठा मिळेल. नात्यांमध्ये गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी. घरात वातावरण आनंदी राहील.

कन्या (Virgo): प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. जुने हेवेदावे मिटवा. कटुता टाळा. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. वाहन जपून चालवा.

तूळ (Libra) : प्रवास टाळा. नवीन जनसंपर्क फायद्याचे. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील. तब्ब्येतीच्या किरकोळ कुरबुरी राहतील.

वृश्चिक (Scorpio) : सुयोग होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. आपली मध्यवर्ती फलद्रूप होईल. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील.

धनु (Sagittarius) : कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जुनी अडलेली कामे मार्गी लागतील. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. घाई करू नये. स्थावर खरेदी योग.

मकर (Capricorn) : व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत. येणी वसूल होतील. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कुंभ (Aquarius) : हातातील कामे पूर्ण करावीत. स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा.

मीन (Pisces) : स्त्री सहकार्‍यांची मदत मिळेल. मनासारखी गोष्ट घडेल. मोठा फायदा होईल. हवी असलेली वस्तू सापडेल. नवीन ओळखीचा महत्त्वाचा फायदा होईल.

Advertisement