SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता विमा हप्त्यामध्ये होणार वाढ, विमा खरेदी करण्याआधी ‘या’ महत्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या..

कोरोनानंतर विम्याबाबत लोक चांगलेच जागरूक झाले आहेत. सध्याच्या काळात लोक लाईफ इन्शुरन्स (Life Insurance), हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance) काढण्यावर भर देत आहेत. पण आता तुम्हाला माहीती आहे का? पुढील वर्षापासून विमा खरेदी करण्यासाठी आपल्याला 20-40 टक्के अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे, अशी माहीती एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी दिली आहे.

प्रीमियम वाढवण्याचं कारण काय?

Advertisement

देशातील बऱ्याच विमा कंपन्यांनी (Insurance componies) प्रीमियम वाढवण्यासाठी IRDAI कडे अर्जही सादर केले आहेत. काही विमा कंपन्या जागतिक पुनर्विमा कंपन्यांशी चर्चा करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जर जागतिक पुनर्विमा कंपनीने त्याचे शुल्क वाढवले ​​नाही, तर ग्राहकांना अधिक प्रीमियम भरावा लागणार नाही. प्रीमियममधील वाढीचा परिणाम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पॉलिसींवर होईल.

मागील 2 वर्षांपासून पुनर्विमा कंपन्यांना जास्त प्रमाणात विम्यावर दावे द्यावे लागत असल्याने नुकसान वाढले आहे. अशा परिस्थितीत हा तोटा भरून काढण्यासाठी आगामी काळात कंपन्या ‘हेल्थ पॉलिसी’ची किंमत वाढवण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार, विमा प्रीमियमची रक्कम 20 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement

विम्याचा हप्ता वाढविण्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. आता यापुढे ओढता येणार नाही. कोरोना महामारीमुळे विमा दाव्यांमध्ये मोठी वाढ झाली. यामुळेच जागतिक पुनर्विमा कंपन्या आता अधिक शुल्क आकारत आहेत. अशा स्थितीत विमा कंपन्यांकडे प्रीमियम वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी अलीकडेच सांगितले होते की लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन पुनर्विमा कंपन्यांशी सतत चर्चा करत आहे. छोट्या विमा कंपन्यांकडे पुनर्विमादाराशी सौदेबाजी करण्याची लवचिकता नसते. अशा परिस्थितीत त्यांनी IRDAI समोर प्रीमियम वाढवण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्याचबरोबर बड्या विमा कंपन्या अजूनही चर्चेच्या माध्यमातून ही समस्या टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

रिटेल प्रीमियममध्ये 60% पर्यंत वाढ…?

मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्सचे सीईओ संजय केडिया यांनी म्हटलंय की, कॉर्पोरेट लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम यापूर्वीच वाढलेले आहेय. अतिरिक्त प्रीमियमचा भार कॉर्पोरेट्स सध्या सहन करत आहेत. ग्रुप कॉर्पोरेट पॉलिसींचा प्रीमियममध्ये 300-1000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ते म्हणतात की, येत्या काही काळात रिटेल प्रीमियम 40-60 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, तर कॉर्पोरेट प्रीमियम दर 50-100 टक्क्यांनी वाढू शकतो, असे मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्सचे सीईओ संजय केडिया यांनी सांगितलंय.

Advertisement

(इन्शुरन्सविषयी इतर माहीतीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या 👉 https://www.irdai.gov.in/Defaulthome.aspx?Page=H1 )
➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement