SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शिवसेना आमदाराचा अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, राजस्थानातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या..!

मुंबईतील कुर्ल्याचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना अश्‍लिल व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या राजस्थानातील तरुणाच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांच्या सायबर सेल युनिटने सोमवारी (ता. 22) ही कारवाई केली..

मौसमदीन मेव (वय २८) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. राजस्थानातील सिकारी जिल्ह्यात तो राहतो. महिला असल्याचे भासवून आरोपी मेव याने २० ऑक्टोबरला आमदार कुडाळकर यांना मेसेज करुन मदत करण्याची विनंती केली.

Advertisement

पैशांची मागणी वाढत गेली..
कुडाळकर यांनीही मदतीसाठी सहमती दर्शवली. त्यानंतर आरोपीने कुडाळकर यांना ‘व्हिडिओ कॉल’ केला. हा काॅल बंद होताच, काही वेळात कुडाळकर यांचा एक अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना व्हॉट्स अॅपवर पाठवला. त्यानंतर आरोपी मेव याने कुडाळकर यांच्याकडे पैशांची मागणी केली.

सुरुवातीला कुडाळकर यांनी काही रक्कम दिली, पण नंतर आरोपीने अधिक पैशांची मागणी केली असता, कुडाळकर यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला.

Advertisement

पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवित काॅलचे लाेकेशन चेक केले असता, राजस्थानातील भरतपूर येथून हा काॅल आल्याचे समोर आले. मुंबई सायबर पोलिसांनी तातडीने भरतपूर गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला जेरबंद केले.

याबाबत पोलिस उपायुक्त (सायबर) रश्मी करंदीकर यांनी सांगितले, की “आम्ही आराेपीचा ‘ट्रान्झिट रिमांड’ घेतली आहे. त्याच्यासह पोलिसांचे पथक बुधवारी (ता. 24) मुंबईत येणार आहे. ते आल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ..!”

Advertisement

असा बनविला अश्लिल व्हिडीओ..
आरोपी मेव याने व्हिडिओ रेकॉर्डर अॅपच्या साहाय्याने कुडाळकर यांचा अश्लील व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याने कुडाळकर यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अखेर आरोपी मेव यास अटक करण्यात आल्याची माहिती भरतपूरचे पोलिस अधीक्षक देवेंद्र कुमार विश्नोई यांनी दिली.

राजस्थानमधील भरतपूर इथल्या सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपी मेव याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतले. लवकरत या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement