SpreadIt News | Digital Newspaper

टीम इंडियाच्या ताफ्यात घुसली अनोळखी गाडी, सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ, नंतर समोर काय आले, वाचा..?

टीम इंडियाने न्युझीलंडविरुद्धची टी-२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकल्यानंतर आता दोन्ही संघ कसोटी मालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे.

टी-२० मालिका संपवून दोन्ही संघातील कसोटीपटू सोमवारी (ता. २२) कलकत्त्याहून कानपूरला पोहोचले. पण, कानपूर येथे पोहोचताच या खेळाडूंना धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. नेमका काय प्रकार झाला, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं काय घडलं..?
मिळालेल्या माहितीनुसार, भारत व न्यूझीलंडचे संघ कानपूर येथे पोहोचल्यानंतर विमानतळावरून हॉटेलसाठी रवाना होत असताना, काळ्या रंगाची एक ‘एक्सयूव्ही’ (XUV) अचानक खेळाडूंच्या ताफ्यात घुसली. अनोळखी गाडी संघाच्या ताफ्यात शिरल्यानं एकच घबराट उडाली.

सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली.. सगळेच सतर्क झाले.. मात्र, त्यानंतर जे समोर आले, ते पाहून साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.. तातडीने या गाडीतील लोकांची चौकशी करण्यात आली असता, त्यात ‘बीसीसीआय’चे काही अधिकारी असल्याचे समोर आले. ती कारही हॉटेलकडेच जात असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

दरम्यान, पहिल्या कसोटीसाठी भारताच्या पाच खेळाडूंसह न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ‘स्पाइस जेट’ने सोमवारी (ता. २२) दुपारी २.२५ वाजता कानपूरला पोहोचला. ‘चकेरी’ विमानतळावरुन दोन्ही संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ व प्रशिक्षकांसह हॉटेलसाठी रवाना झाले.

दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या बसची सोय केली होती. कानपूरमध्ये आलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये लोकेश राहुल, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, आर. अश्विन व मोहम्मद सिराज यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी व गोलंदाजी प्रशिक्षकही होते.

Advertisement

सलामीला नवीन जोडी
सलामीवीर म्हणून सतत फ्लॉप होत असलेल्या शुभमन गिलला मधल्या फळीत खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्मा या मालिकेत नसल्याने के.एल. राहुलसोबत मयांक अग्रवाल ही नवी जोडी सलामीला उतरणार आहेत. दुखापतीमधून सावरुन शुभमन गिल नुकताच संघात परतला आहे.

भारतीय संघ – अजिंक्य रहाणे ( कर्णधार), चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, के.एस. भरत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Advertisement

न्यूझीलंड संघ – केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, राचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement