SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका. नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला.

वृषभ (Taurus) : असंतोषाची भावना मनात वाढेल. कौटुंबिक स्थिती संयमाने हाताळा. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

मिथुन (Gemini): भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल. नवीन ओळखी वाढतील.

कर्क (Cancer) : नोकरी धंद्यात सहकार्‍यांचे सहकार्य चांगले मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज मनातील बोलता येईल. नकारात्मक परिणाम साधतील.

सिंह (Leo) : जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. प्रेमाला उत्तम साथ मिळेल.

कन्या (Virgo): ओळखीचे मैत्रीत रूपांतर होईल. जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शरीर प्रकृती ठीक नसेल.

तूळ (Libra) : कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये. कामातील समस्या सोडवता येतील.

वृश्चिक (Scorpio) : मनात अनामिक भीती दाटून येईल. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल.

धनु (Sagittarius) : आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल. परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. आर्थिक गणिते सुधारतील.

मकर (Capricorn) : योजनेला मूर्त रूप द्याल. विरोधकांकडे लक्ष ठेवा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका.

कुंभ (Aquarius) : एखादी घटना मन खिन्न करू शकते. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल.

मीन (Pisces) : गृहसजावटीत बदल कराल. विरोधक नरमाईने घेतील. हातातील काम पूर्ण होईल. लहान प्रवास घडेल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

Advertisement