खरीप असो वा रब्बी हंगाम.. शेतकऱ्यांना सर्वाधिक चिंता असते, ती तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या मालाला नेमका किती भाव मिळणार याची..! बऱ्याचदा पीक काढण्यापूर्वी शेतमालाला चांगला भाव असतो, मात्र माल शेतकऱ्याच्या घरात आला की भाव कोसळतात..
शेतकऱ्याला पिकविता येते, पण विकता येत नसल्याचे बोलले जाते. कधी कधी तर भाव कोसळल्याने रस्त्याच्या बाजूला शेतमालाच्या राशी लावून शेतकरी रिकाम्या हाताने घरी जातो.. कधी दुसऱ्या शहरात त्याच मालाला चांगला दर असतो, पण त्याची माहितीच शेतकऱ्याला नसते..
पण थांबा.. आता शेतमालाचे भाव जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्केटला जावे लागणार नाही किंवा त्याला कोणालाही फोनही करण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या एका क्लिकवर फोनवर तुमच्या जवळच्या मार्केटमधीलच नव्हे, तर देशातील मार्केटमधील शेतमालाचे दर समजणार आहेत..
असे जाणून घ्या शेतमालाचे भाव..!
● सर्वप्रथम agmarknet.gov.in या संकेतस्थळावर जा. या वेबसाईटच्या डावीकडे ‘सर्च’ पर्याय दिसेल.
● तेथे प्राईस (price) रकाना दिसेल. तो तसाच ठेवून ‘कमोडिटी’ (commodity) पर्यायावर क्लिक करा. तेथे पिकाचे नाव सिलेक्ट करा.
● पुढे राज्य, जिल्हा निवडा. नंतर समोर असलेल्या ‘मार्केट’ पर्यायावर जवळची बाजारपेठ निवडा.
● नंतर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत भाव पाहायचे आहेत, तो कालावधी निवडा व ‘गो’ (Go)वर क्लिक करा.
● तुमच्या समोर ओपन झालेल्या पेजवर तुम्ही निवडलेल्या पिकाचे त्या मार्केटमधील बाजारभाव दिसतील.
300 शेतपिकांचे भाव उपलब्ध
जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती भाव मिळाला, तसेच सर्वसाधारण दर काय होता, याचीही माहिती या वेबसाईटवर शेतकऱ्यांना मिळणार आहे. विक्रीयोग्य 300 शेतपिकांचे बाजारभाव वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते..
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511