SpreadIt News | Digital Newspaper

निवृत्तीचे वय वाढणार..? पेन्शनही वाढणार..? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..!

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही खुशखबर म्हणजे, मोदी सरकार लवकरच सरकारी कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढविण्याच्या विचारात आहे. आर्थिक सल्लागार समितीने युनिव्हर्सल पेन्शन सिस्टमचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविला आहे.

‘वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस-2019’नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. देशातील सुमारे 19.5 टक्के लोकसंख्या निवृत्तांच्या श्रेणीत असेल. 2019 मध्ये, एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के म्हणजेच 14 कोटी लोक ज्येष्ठ आहेत.

Advertisement

‘युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीम’ सुरु करा
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटलंय, की सरकारी कर्मचाऱ्यांची काम करण्याची वयोमर्यादा वाढविली पाहिजे.  देशात निवृत्तीचे वय वाढविण्यासोबतच ‘युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीम’ही सुरू करण्याची गरज असल्याचे आर्थिक सल्लागार समितीने म्हटलंय.

आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम आर्थिक व्यवस्था करण्याची शिफारस मोदी सरकारला केलीय. निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा किमान २ हजार पेन्शन देण्यात यावी, असे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलेय..

Advertisement

निवृत्तीचे वय वाढवावे लागणार
सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी आताच हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. कामकाज वयोगटातील लोकांची संख्या वाढविण्यासाठी निवृत्तीचे वय वाढवावे लागणार आहे, असे नमूद करतानाच अहवालात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही सांगितले आहे.

असंघटित क्षेत्रातील, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याची साधने नाहीच, अशा लोकांचाही यामध्ये समावेश असावा, मात्र त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत, जेणेकरून कौशल्य विकास करता येईल, असे अहवालात म्हटले आहे.

Advertisement

सध्या या प्रस्तावाचा चेंडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात असून, त्यांनी त्यास मंजूरी दिल्यास लवकरच हे दोन्ही निर्णय होण्याची शक्यता आहे..

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement