SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुरुंगात बसून 5 देशांतील नागरिकांना कोट्यवधीचा गंडा.., बीडच्या तरुणाचा कारनामा..!

बीडमधील एका तरुणाच्या कारनाम्याने खळबळ उडालीय.. चक्क तुरुंगात बसून, 5 देशांतील नागरिकांना या तरुणाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आलेय.. मात्र, त्यासाठी आपल्याला तुरुंग अधिकारी व काही कर्मचाऱ्यांनीच भाग पाडल्याचा आरोप या तरुणाने केला आहे…

बीडमधील या तरुणाचे नाव आहे, अमर अनंत अग्रवाल.. निष्णात हॅकर (Hacker). मात्र, त्याने आपली बुद्धी चुकीच्या ठिकाणी वापरली.. अशाच एका सायबर गुन्ह्यात (cyber crime) 2018 मध्ये अमर अग्रवाल पकडला गेला नि तो जेलमध्ये गेला.

Advertisement

मध्य प्रदेशातील भैरवगड कारागृहात फसवणूकीच्या गुन्ह्यात तो शिक्षा भोगत होता. पण, तुरुंगातही तो शांत बसला नाही. एका गुन्हाची शिक्षा भोगत असताना, त्याने दुसरा आणखी मोठा गुन्हा केला.

जेलमध्ये बसल्या बसल्या त्याने तब्बल 5 देशांतील नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. परदेशी लोकांची बँक खाती हॅक करून, त्याने मोठ्या सफाईने त्यांच्या खात्यावरील रकमेची अफरातफर केली. शिवाय काही पंचतारांकीत हॉटेलांना देखील त्याने अशाच प्रकारे लुटल्याचे समोर आलेय.

Advertisement

विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील भैरवगड कारागृहातील दोन तुरुंग अधिकारी, तसेच काही कर्मचाऱ्यांनी आपल्यावर दबाव आणून, हे काम करायला भाग पाडल्याचा दावा आरोपीने केला आहे.

हवाला रॅकेटचा संशय
तुरुंग अधिकाऱ्यांनी हे काम करण्यासाठी आरोपीला काही क्रेडिट कार्ड्स नि लॅपटॉप उपलब्ध करून दिला. त्या आधारे त्याने तुरुंगात बसून, अनेकांना कोट्यवधीचा चुना लावला. अमर अग्रवाल याने हे पैसे ‘हवाला’च्या माध्यमातून फिरविल्याचा पोलिसांना संशय आहे.

Advertisement

काही पैसे संबंधित जेलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाले, तर काही पैसे अमरने स्वतःसाठीही फिरवल्याची शक्यता आहे. तसेच आरोपीच्या गावी बीडमध्येही ‘हवाला’चे पैसे आले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

दुसऱ्या तुरुंगात हलविले..
दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी अमर अग्रवाल याची भोपाळ येथील तुरुंगात रवानगी केली आहे. या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे ‘हवाला रॅकेट’ समोर येण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement