न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातही टीम इंडियाने न्युझीलंडवर 73 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह टीम इंडियाने 3 मॅचची टी-20 सीरिज 3-0 अशी जिंकताना किवी संघाला ‘व्हाईट वॉश’ दिला.
हिवाळ्यात रात्रीच्या वेळी भारतात मोठ्या प्रमाणात दव पडते. अशा वेळी गोलंदाजांना बॉल पकडणंही कठीण असतं.. त्यामुळे रोहित शर्मानेही पहिल्या दोन्ही सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला होता..
मात्र, मालिका आधीच खिशात घातलेली असल्याने, तसेच गोलंदाजांना अशा वातावरणात बॉलिंगचा सराव व्हावा, यासाठी रोहितने टाॅस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. के. एल. राहुल व आर. अश्विन यांच्या जागी भारताने आज ईशान किशन व युझवेंद्र चहल यांना संधी दिली.
न्युझीलंडविरुद्ध होणाऱ्या टेस्टमध्ये या दोघांचा समावेश असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली. न्युझीलंड संघानेही टीम साऊदी याला विश्रांती देताना मिचेल सॅण्टनरकडे नेतृत्व दिलं होतं.
कलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर रोहित शर्मा (५६) व ईशान किशन यांनी नेहमीप्रमाणेच आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र, नंतर सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत अपयशी ठरले. श्रेयस अय्यर (२५) व व्यंकटेश अय्यर (२०) यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनाही मोठा स्कोअर करता आला नाही.
अखेरच्या षटकांत हर्षल पटेल (18), दीपक चहर (नाबाद 21) यांच्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 18४ पर्यंत गेला. न्यूझीलंडकडून मिचेल सॅन्टनरला सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, एडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन व ईश सोढी यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
भारताने दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंडचा संघ अवघ्या 111 धावांवर ऑल आऊट झाला. अक्षर पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 9 रन देताना 3 विकेट घेतल्या, हर्षल पटेलने 2, तर दीपक चहर, युझवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टीलने 36 बॉलमध्ये 51 रन केले. मात्र, त्याच्याशिवाय कोणत्याही फलंदाजाला मोठा स्कोअर करता आला नाही. भारताने मोठ्या दिमाखात तिसरा सामना जिंकताना किवी संघाला व्हाईट वाॅश दिला..
रोहितने विराटचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
या मॅचमध्ये खेळताना कॅप्टन रोहित शर्माने विराट कोहलीचा विक्रम मोडला.. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 30 वेळा 50 पेक्षा जास्त स्कोअर केला, तर विराटने 29 वेळा 50 पेक्षा जास्त स्कोअर केलाय. बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 25 वेळा 50 प्लस स्कोअर केला आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि मार्टिन गप्टीलने 21 वेळा 50 पेक्षा जास्तचा आकडा गाठला. रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4 शतकेही आहेत. एवढी शतकं ठोकणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511