SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लग्नानंतर मुलीच्या पॅनकार्डमधील नाव, पत्ता कसा बदलायचा..? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

परमनंट अकाऊंट नंबर.. अर्थात पॅन कार्ड (PAN).. आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात महत्त्वाचा दस्ताऐवज. कोणताही आर्थिक व्यवहार करायचा झाल्यास तो पॅनकार्डशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पॅनकार्डमुळे तुमच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला कळण्यास मदत होते..

लग्नानंतर मुलीचे नाव, पत्ता बदलला जातो. त्यामुळे तसे बदल मुलीच्या कागदपत्रांमध्ये करावे लागतात. बऱ्याचदा किचकट प्रोसेसमुळे हे बदल करण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, त्यामुळे नुकसान होण्याचीही शक्यता असते.

Advertisement

लग्नानंतर मुलीच्या पॅनकार्डमध्ये नाव, पत्ता बदलायचा असेल, तर त्यासाठी सोपी प्रक्रिया आहे. अगदी घरबसल्याही हे काम करता येते. चला तर मग ही प्रोसेस जाणून घेऊ या…

पॅनकार्डमधील नावात/ पत्यात बदल
– नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या वेबसाईटला भेट द्या..
– ‘विद्यमान पॅनमध्ये सुधारणा’ हा पर्याय निवडा, श्रेणी प्रकार निवडा.
– योग्य नाव अचूक स्पेलिंगसह भरुन कागदपत्रे जोडा (PAN मध्ये बदल)

Advertisement

– पत्ता किंवा आडनाव बदलण्यासाठी 110 रुपये शुल्क भरावे लागते.
– सबमिट पर्यायावर क्लिक करा / एनएसडीएल पत्त्यावर आयकर पॅन सर्व्हिस युनिट (NSDL ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारे व्यवस्थापित) वर अर्ज पाठवा.
– अर्ज केल्यापासून 45 दिवसांत नोंदणीकृत पत्त्यावर अपडेट केलेले पॅनकार्ड पाठवले जाते.

पॅनकार्ड अपडेट कसे करायचे..?
– ‘एनएसडीएल’ (NSDL)ची अधिकृत वेबसाईट www.tin-nsdl.com ला भेट द्या.
– सेवा विभागांतर्गत, ‘PAN’ वर क्लिक करा.
– ‘पॅन डेटामध्ये बदल/सुधारणा’ या विभागातील ‘लागू करा’वर क्लिक करा.

Advertisement

– ‘अॅप्लिकेशन प्रकार’ ड्रॉपडाऊन मेनूमधून ‘विद्यमान पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा/पॅन कार्डचे पुनर्मुद्रण निवडा.
– ‘श्रेणी’ ड्रॉपडाउन मेनूमधून, करनिर्धारणाची योग्य श्रेणी निवडा, उदा. तुमच्या नावावर पॅन नोंदणीकृत असल्यास, सूचीमधून ‘वैयक्तिक’ निवडा.

– नाव, जन्मतारीख, ई-मेल, पत्ता आणि मोबाईल नंबर टाका.
– कॅप्चा भरा नि ‘सबमिट’ करा.
– तुमची विनंती नोंदवली जाईल. दिलेल्या ईमेल आयडीवर टोकन क्रमांक पाठविला जाईल.

Advertisement

– खालील बटणावर क्लिक करून प्रक्रिया सुरू ठेवू शकता.
– आई-वडिलांची नावे, तुमचा आधार क्रमांक आणि ‘पुढील’ वर क्लिक करा. सर्व आवश्यक तपशील भरा.
– आता तुम्हाला नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, जेथे तुमचा पत्ता अपडेट करता येईल.

– आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. तुम्हाला घोषणेवर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ‘सबमिट’ करा.
– डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे पेमेंट करता येईल.

Advertisement

– पेमेंटच्या पोचपावतीची प्रिंट काढून कागदपत्रांच्या प्रत्यक्ष पडताळणीसह ‘एनएसडीएल ई-गर्व्हनन्स’ कार्यालयात पाठवतात. दिलेल्या जागेवर फोटो चिकटवून त्यावर स्वाक्षरी करा. पावती क्रमांकासह पाकिटावर ‘पॅन बदलासाठी अर्ज’ असे लिहा. लवकरच घरपोच पॅनकार्ड मिळेल..

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement