SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑनलाईन सेलमध्ये खरंच स्वस्त वस्तू मिळतात का..? कसे असते डिस्काऊंटचे गणित, वाचा

भारतात गेल्या काही दिवसांत ऑनलाईन शॉपिंगचे (Online shopping) फॅड प्रचंड वाढलंय. अगदी साध्या टाचणीपासून ते मौल्यवान वस्तू एका क्लिकवर घरपोच येतात. सुरुवातीच्या काळात ऑनलाईन खरेदबाबत लोकांना फारशी माहिती नव्हती..

मागील काही काळात हे चित्र पूर्णपणे बदलले असून, आता लोक खरेदीसाठी दुकानांच्या पायऱ्या चढण्याऐवजी मोबाईलवरच बोटे फिरवताना दिसतात.. ऑनलाईन शाॅपिंग म्हणजे, खूप सारा डिस्काऊंट.. असा एक समज आहे.

Advertisement

कारण, विविध ई-काॅमर्स कंपन्या ठराविक कालावधीनंतर आपले सेल जाहीर करीत असतात. त्यात विविध वस्तूंवर सेल जाहीर करतात. शिवाय ठराविक बॅंकेच्या कार्डवर शाॅपिंग केल्यास त्यातही सवलत मिळते.

सेलमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीही होत असल्याचे दिसते.. मात्र, ऑफर्समधून एखादे वेळी फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन शाॅपिंग करताना काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

कोणत्या ऑनलाईन साईट्सवर खरेदी करावी..?
सध्या ढिगाने ई-काॅमर्स कंपन्या सुरु झालेल्या आहेत. मात्र, अशा वेळी विश्वासार्ह साईट्स निवडणे आवश्यक असते. आपल्याला लागणारी वस्तू कोणत्या साईटसवर स्वस्त मिळेल, याची माहिती घेऊन साईट्स निवडू शकता.

काय घ्यायचंय, ते ठरवा..!
ऑनलाईन शाॅपिंग करताना बऱ्याचदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. डिस्काऊंटच्या आमिषाला भुलून आपण अनावश्यक वस्तू खरेदी करतो. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला कोणती वस्तू घ्यायचीय, ते ठरवा…

Advertisement

वस्तूच्या किंमती तपासून घ्या
ऑनलाईन शाॅपिंग करण्यापूर्वी आपल्याला हवी असणारी वस्तू कोणत्या साईटवर स्वस्त मिळू शकते, ते पाहा. वस्तूची कंपनी, कंपनीचं रेटींग, ग्राहकांचा फिडबॅक अवश्य पाहा. ओळखीच्या लोकांकडून संबंधित वस्तूबाबत सल्ला घेतल्यास फायदाच होईल..

स्वस्त वस्तू कशा खरेदी करणार..?
ऑनलाईन कंपन्यांचे मोठे सेल येण्यापूर्वी आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तूच्या किमतीवर किमान महिनाभरापासून लक्ष ठेवा. सेलमध्ये त्या वस्तूची किती किंमत कमी झाली? इतर साईटवर ती वस्तू कितीला आहे, याची माहिती घ्या.. बँकाच्या ऑफर्सही फायदा घेता येतो.

Advertisement

सेलमध्ये स्वस्त वस्तू मिळतात…?
ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या सेलमध्ये खरंच कमी किमतीत वस्तू मिळतात, असा प्रश्न अनेकदा पडतो. मात्र, सगळ्यात वस्तूंवर ही सूट मिळत नाही. सध्या सर्वाधिक सूट इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर मिळते.

काही वेळा मार्केटमध्ये नवीन आलेल्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या किंमती कमी करतात. पण, ऑनलाईन कंपन्या त्याची मूळ किंमत वाढवून मग त्यावर घसघशीत सूट दाखवून ग्राहकांना आकर्षित करतात. अशा वेळी तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.

Advertisement

सेलमध्ये स्वस्त वस्तू कशा मिळतात?
नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, की कोणतीही कंपनी तोट्यात व्यवसाय करीत नसते. ऑनलाईन शॉपिंग कंपन्या सेल जाहीर करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे कंपन्यांकडून त्यांना सूट मिळते. हीच सूट सेल्समध्ये दिली जाते. अर्थात, सुट देऊनही ऑनलाईन कंपन्या नफा कमवित असतात..

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement