SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कडकनाथ कोंबड्यांना पुन्हा एकदा मागणी.. सर्दीवर ठरतेय जालीम उपाय, 10 हजारांवर वेटिंग..

थंडीच्या दिवसांत सर्वाधिक मागणी असते, ती चिकन-अंडीला.. सध्या ढगाळ हवामानामुळे गुलाबी थंडीचा आस्वाद घेता येत नसला, तरी लवकरच थंडीला जोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सध्या चिकन-अंडीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे दिसत आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी एका नावाची खूप हवा झाली होती, ते म्हणजे कडकनाथ कोंबडी.. नंतरच्या काळात त्याबाबत काही अफवा उठल्याने हे नाव काहीसे मागे पडले होते. मात्र, आता पुन्हा एकदा कडकनाथ कोंबडीला (Kadaknath Chicken) ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे.

Advertisement

थंडीला सुरुवात होताच, ग्वाल्हेरच्या कृषी विज्ञान केंद्रातील कडकनाथ कोंबड्यांना पाच पटीने मागणी वाढली आहे. मात्र, एकदम एवढी मागणी पूर्ण होऊ शकत नसल्याने केंद्रात कडकनाथच्या कोंबड्यांसाठी 10 हजारांपर्यंत वेटिंग असल्याचे सांगण्यात आले..

कडकनाथमध्ये अधिक पोषण मूल्ये
कडकनाथ कोंबड्यांमध्ये सामान्य कोंबड्यांपेक्षा अधिक पोषक मूल्ये असतात. त्यात प्रोटीन 25 टक्के, फॅट 0.73 ते 1.03 टक्के, लिनोलिक अॅसिड 24 टक्के, तर कॅस्ट्रॉल 184 मिली ग्रॅम असते.

Advertisement

कडकनाथ कोंबड्यांमधील चांगस्या मेडिसिनल मुल्यांमुळे आजार जवळपास फिरकतही नाहीत.. कडकनाथ कोंबड्यांचे रक्त, मांस नि हाडंही काळी असतात. थंडीच्या दिवसांत कडकनाथचं मांस फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. विशेषत: सर्दीवर ही जालिम उपाय असल्याचे म्हणतात.

सध्या देशभरातून कडकनाथ कोंबड्यांची मागणी 4 ते 5 पटींनी वाढली आहे. कडकनाथ कोंबड्या उष्ण असतात. त्यामुळे थंडीमध्ये त्या फायदेशीर ठरतात. सध्या देशभरातून मागणी वाढल्याने ती एकदम पूर्ण करणे अशक्य आहे..

Advertisement

ग्वाल्हेरमध्ये होते कडकनाथचे उत्पादन
ग्वाल्हेर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ. राजसिंह कुशवाह यांनी सांगितले, की ग्वाल्हेरच्या कृषी विज्ञान केंद्रात 2016 मध्ये कडकनाथ कोंबड्याचे उत्पादन सुरू झालं. हे देशातील तिसरे असे केंद्र आहे, जेथे कोंबड्यांची हेचिंग केली जाते..

..म्हणजेच कडकनाथच्या अंड्यांमधून पिल्लं तयार करुन त्याची देशभर विक्री केली जाते. येथील पिल्लांना देशभरातून मागणी असते. विशेषत: थंडीच्या दिवसात मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात कडकनाथला मागणी असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement