बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर कपूर याच्यासोबत ‘कमला पसंद’ पान मसाला ब्रॅंडची जाहीरात केली होती. त्यावरुन बच्चन यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते..
अमिताभ बच्चन हे बाॅलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यांना अनेक जण फाॅलो करीत असतात. मात्र, त्यांच्या पानमसाल्याच्या जाहीरातीवरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
अखेर अमिताभ यांनी आपला 79 वा वाढदिवस साजरा करताना मोठा निर्णय जाहीर केला. विविध माध्यमातून होणाऱ्या टीकेची गंभीर दखल घेत, बिग बींनी ‘कमला पसंद’ पान मसाला कंपनीसोबतचा करार संपविण्याचा निर्णय घेतला होता.
करार संपवूनही जाहीरात ऑन एअर
दरम्यान, अमिताभ यांच्या या निर्णयानंतरही ही जाहिरात टीव्हीवर दाखविण्यात येत आहे. करार मोडलेला असतानाही ‘कमला पसंद’ पान मसाल्याची जाहिरात ऑन एयर जात आहे. त्यामुळे ‘बिग बीं’नी या कंपनीला कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवली आहे. दरम्यान, याबाबत कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
काही दिवसांपूर्वी अमिताभ आणि रणवीर सिंग यांनी एकत्र ‘कमला पसंद’ पानमसालाच्या जाहिरातीत एकत्र काम केले होते. अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण यांच्यासारखी पान मसाल्याची जाहिरात केल्यामुळे अमिताभ यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या पान मसालाच्या ब्रँडसोबत करार संपवण्याचा निर्णय घेतला होता…
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511