SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शनिवार, 20 नोव्हेंबर 2021

Advertisement

मेष (Aries) : आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही. घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा.

वृषभ (Taurus) : औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. सामाजिक भान राखून वागावे. मानसिक शांतता लाभेल. घरासाठी मोठी वस्तू खरेदी कराल.

Advertisement

मिथुन (Gemini): आज तब्बेत यथा तथा राहील. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हरवलेली वस्तू सापडेल. जोडीदाराच्या कलेचे कौतुक कराल.

कर्क (Cancer) : शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. गोष्टी मनासारख्या घडतील. मुलांशी सुसंवाद साधता येईल. अभ्यासाचा कंटाळा करू नका.

Advertisement

सिंह (Leo) : गोड बोलून कार्यभाग साधावा. वाणीत माधुर्य ठेवावे. समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल. मन विचलीत होऊ देऊ नका. कामात बदल जाणवेल.

कन्या (Virgo): वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. भगवंताचे नामस्मरण करावे. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील.

Advertisement

तूळ (Libra) : उगाच नसत्या भानगडीत स्वत:ला गुंतवू नका. प्रेमातील गोष्टी लांबणीवर पडू शकतात. नोकरीत प्रशंसा होईल. मानसिक गोंधळ टाळावा.

वृश्चिक (Scorpio) : जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका. हानिकारक विचार दूर सारा.

Advertisement

धनु (Sagittarius) : शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. मुलांशी सुसंवाद साधावा. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल.

मकर (Capricorn) : सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा. घरातील जुन्या वस्तूंचा शोध घ्याल.

Advertisement

कुंभ (Aquarius) : घरातील जुन्या कामात अडकून राहाल. अटीतटिचे वाद वाढवू नका. वाचनात वेळ घालवावा. प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल.

मीन (Pisces) : बचतीच्या योजना आखाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. अनावश्यक खर्च टाळावा. जोडीदारामुळे भाग्योदय होईल.

Advertisement