SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ गोष्टी लगेच डोक्यातून काढून टाका, अन्यथा होणार नाही प्रगती! वाचा प्रत्येक माणसाच्या यशासाठी काही सूत्रे..

आपला रोजचा दिवस आपण नेहमीप्रमाणे सुरू करतो. दिवसागणिक त्यातील क्षणांचे महत्वही आपल्या आयुष्यात मोलाचे आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. पण दिवस सरता सरता आपल्या मनात सतत काहीतरी विचारमंथन चालू असतं. अनेक गोष्टी, गोंधळवणारे विचार डोक्यात सतत येतात.

तर हे आम्ही तुम्हाला का सांगतोय कारण आपण प्रत्येक मोठी-छोटी गोष्ट करताना कोणाचा ना कोणाचा सल्ला किंवा मत बघतोच आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो.
जास्त विचारांचा, मनाला त्रास होईल अशा विचारांचा नेहमी डोक्यात काहूर माजणं, कोणत्याही अनावश्यक विचारांचं ओझं राहतं, त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टीच नेहमी आठवतात. मग तुम्हाला असं वाटतं की, डोक्यातील एखादी गोष्ट कायमची डिलीट करून टाकावी म्हणजे नकोच कटकट! प्रत्यक्षात तसं होणे नाही; पण तुम्ही ते करू शकता. त्यासाठी आपली विचारधारा बदलणं गरजेचं आहे. (Tips for mental health) मग असंही काही करणं गरजेचं आहे जे तुमचं मानसिक आरोग्य बरोबर ठेवू शकेल. यासाठी तुम्ही खालील टिप्स नक्की वाचा..

Advertisement

विश्वास ठेवा, पण हुशारीने! (Trust is important)

माणूस हा हुशार असून त्याला भावनिक केलं की त्याला आयुष्यात अशाच गुणाची सवय होते. आयुष्यात आपल्याला काम काढून घेण्यासाठी असो की मदत करण्यासाठी कोणाला ना कोणाला गरज असतेच. पण कधी कधी भावनिक असणं तुमच्या स्वतःला नुकसान पोहोचवू शकतं. म्हणून मोठे-मोठे निर्णय घेताना, एखाद्या व्यक्तीला सोबत घेताना, त्या व्यक्तीवर विश्वास टाकून आपली गुपितं सांगताना ते विश्वासपात्र असतातच, पण कोणीही आपल्या विश्वासाला पात्र असतोच असे नाही. त्यामुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा.

Advertisement

आधी स्वतःच्या चुका बघा आणि सुधरवा (mistakes)

आयुष्यात अनेक गोष्टी फेल जातात. तेव्हा कोणावरही दोषारोप केले जातात आणि मग दोष देणं अजून एकेकाचं वाढत जातं. म्हणूनच आपण आपल्या चुकांसाठी इतरांनाही दोष देतो. कारण आपला गळा मोकळा होतो. पण जर चूक करताना आपणही तितकेच जबाबदार आहोत का हेही पाहावे आणि आपल्याकडून चूका झाल्यास हताश न होता त्या कशा सुधारतील हे बघावं आणि गिल्टमधून बाहेर पडून सकारात्मक आयुष्य जगा.

Advertisement

प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणून नुकसान नको; नकार स्पष्टपणे द्या! (Say ‘no’)

प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणण्याची गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, समोरील व्यक्तीला वाईट वाटेल. तर एक दोन वेळेस ठीक आहे, पण तुम्ही काही गोष्टीत तुमचं करिअर, आयुष्य, कुटुंब अशा काही जबाबदारीच्या गोष्टी पणाला नाही लावू शकत. म्हणून जर आपलं नुकसान होत असेलच तर समोरच्याला धीर देत आपण करू शकत नसलेल्या गोष्टींना नाही म्हणण्यास लाजू नका. हो म्हटल्यानंतर जर तुम्हाला ते काम करताना मानसिक ताण येत असेल तर ते तुमच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे नेहमी हो म्हणणे टाळा. जमणार नसेल सरळ चांगल्या व स्पष्ट भाषेत ‘नाही’ असं जरूर म्हणा.

Advertisement

कूछ तो कहेंगे लोग…(kuch toh kahenge log)

आपण आपले शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक निर्णय (decision making) जर स्वतःच्या कुशलतेनुसार घेतले नाहीत, तर त्याप्रमाणे आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागते. जर तुम्ही “लोक काय म्हणतील” याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर ही सवय बंद करा. याने तुमचं आयुष्य गंडतं, हे माहीत असायला हवं. आयुष्य तुमचे आहे, ते तुमच्या पद्धतीने जगा. लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची जबाबदारी तुमची नाही. कारण लोक वेळेला तोंड फिरवतात, गरजेला पाठ फिरवतात. लोक काही केलं तरी चर्चा करतात. ते त्यांच्या विचारक्षमेतनुसारच बोलणार किंवा सल्ले देणार. तुम्ही याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष द्या. कारण प्रत्येक गोष्टीची किंमत किती आहे आणि किती चुकवावी लागणार हे तुम्हालाच ठाऊक असते. म्हणून प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement