SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कर्ज घेणं होईल सोपं! इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल, तर तुम्हाला मिळतील आठ मोठे फायदे..

जर तुम्हीही ITR भरत असाल, तर इन्कम टॅक्स रिटर्न 2020-21 या वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. देशात नोकरी करणारे अनेक लोक आहेत. ज्यांचा पगार कराच्या कक्षेत येत नाही किंवा कराच्या कक्षात आला तरी आयटीआर भरण्याची गरज नाही असे त्यांना वाटत असतं. पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की, प्राप्तिकर रिटर्न भरण्यातही काही फायदे आहेत, जे तुम्हालाही मिळू शकतील, जाणून घ्या सविस्तर ते फायदे कोणते आहेत…

1. उत्पन्नाचा पुरावा (Income Proof)

Advertisement

समजा तुम्ही आयकर रिटर्न भरता तर तुम्ही करदाता झालात. मग अशा करदात्यांना (taxpayers) आयकर रिटर्न भरला तर सर्टिफिकेट मिळते. हा एक सरकारी पुरावा आहे, जो व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दर्शवतो. याचा फायदा असा की, तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि कर्ज घ्यायचं असेल, तर उत्पन्नाचा हाच नोंदणीकृत पुरावा मदत करतो.

2. तुम्हाला कर परतावा हवाय? मग भरा आयटीआर

Advertisement

देशातील काही लोकांचे इन्कम स्लॅब टॅक्सच्या कक्षेत येत नाही, तरीही काही वेळेस TDS मात्र कापलेला आपल्याला आढळला असेल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला परतावा (Return) हवा असेल तर आयटीआर भरणे आवश्यक आहे. आयटीआर दाखल केल्यानंतर, आयकर विभाग त्याचे मूल्यांकन करतो. त्यानुसार तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात तो परतावा दिला जातो.

3. उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ITR आवश्यक

Advertisement

तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आयकर रिटर्न भरणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही विभागाकडून कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल, मोठे कर्ज (business loan) मिळवायचे असेल, तर आयटीआर कामाला येईल. कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट पाहिजे असल्यास मागच्या 5 वर्षांचा आयटीआर आवश्यक आहे.

4. कर्ज मिळवणे सोपे

Advertisement

कर्ज घेताना तुमच्या उत्पन्नाचा पुरावा पाहिला जातो. तुम्ही किती कर्ज घेताय हे तुम्ही किती कमावताय किंवा तुमचं बँक अकाऊंट स्टेटमेंटवर किती जास्त रकमेचे व्यवहार दिसताय यावर अवलंबून असतं. विशेषत: गृहकर्जाच्या (home loan) बाबतीत, उत्पन्नाचा पुरावा म्हणून 3 वर्षांचा ITR मागितला जातो. सर्व सरकारी आणि निमसरकारी बँकांना हा नियम लागू आहे. तुम्ही ITR विना कर्जासाठी अर्ज केल्यास बँका ते नाकारू शकतात. तुम्ही नियमितपणे ITR फाइल केल्यास, तुम्हाला कर्ज मिळण्याची किंवा कर्ज रक्कम मर्यादा आणखी वाढण्याची शक्यता वाढते.

5. आयटीआर हा पत्त्याचा पुरावाही!

Advertisement

तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न मॅन्युअली भरल्यावर आयकर रिटर्नची पावती तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते. यासह तो नमूद पत्ता तुमचा पत्ता म्हणूनही स्वीकारला जातो.

6. जास्तीच्या विमा संरक्षणासाठी आयटीआर आवश्यक

Advertisement

समजा तुम्हाला विमा संरक्षण (insurance cover) जास्त पाहिजे असेल किंवा 1 कोटी रुपयांपर्यंतच्या टर्म प्लॅनसाठीही (term insurance) ITR पाहिला जातो. आपल्या उत्पन्नाचा स्रोत (Income Source) आणि परतफेडीची स्थिती तपासण्यासाठी कंपन्या ITR मागतात.

7. व्हिसासाठी आयटीआर आवश्यक

Advertisement

दुसऱ्या देशात जाण्याच्या आधी व्हिसा हा गरजेचा आहे. व्हिसा काढण्यासाठी जेव्हा तुम्ही अर्ज करता, तेव्हा तिथे तुम्हाला आयकर रिटर्नसाठी विचारले जाते. व्हिसा अधिकारी 3 ते 5 वर्षांचा ITR मागू शकतात. आयटीआरच्या माध्यमातून हे तपासले जाते की जी व्यक्ती आपल्या देशात येत आहे किंवा येऊ इच्छित आहे, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे. यामुळेच ITR भरणे अधिक आवश्यक आहे.

8. शेअर्समधील तोटा झाला तर काय करणार?*

Advertisement

आजकाल बहुतांश जणांना पैसे कमविण्याचे अधिकाधिक स्रोत हवे असतात. जर तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करणारे असाल तर तुमच्यासाठी आयटीआर हा एक चांगला स्रोत आहे. कारण शेअर्समध्ये जर नुकसान झालं, तर तोटा पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड (carry forward) करण्यासाठी दिलेल्या मुदतीत आयटीआर भरणे आवश्यक आहे. पुढील वर्षात नफा झाल्यास, तोटा नफ्याच्या तुलनेत ॲडजस्ट केला जाईल व तुम्हाला कर (Tax) सूटमध्ये लाभ मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement