SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2021

Advertisement

मेष (Aries) : आज मनाप्रमाणे कामे कराल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला.

वृषभ (Taurus) : विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा. भौतिक वस्तूंची खरेदी कराल. आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल.

Advertisement

मिथुन (Gemini): ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. मनोरंजनात्मक दिवस. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे.

कर्क (Cancer) : उत्तम गृहसौख्य लाभेल. नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे. मित्रांशी नाते अतूट होईल.

Advertisement

सिंह (Leo) : जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल. कामात अधिकार प्राप्त होतील. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता.

कन्या (Virgo): कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.

Advertisement

तूळ (Libra) : व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. मित्रांबरोबर काळ चांगला जाईल. काही संमिश्र घटना घडू शकतात.

वृश्चिक (Scorpio) : टीमवर्कचा चांगला फायदा होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा.

Advertisement

धनु (Sagittarius) : सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका. डोळ्यांचा त्रास जाणवेल.

महिला सहकारी उत्तम मदत करतील. व्यावसायिक कामातून आनंद मिळेल. एखादी मोठी वस्तू खरेदी कराल.

Advertisement

कुंभ (Aquarius) : शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.

मीन (Pisces) : मनात दुःख व असंतोष राहील. आर्थिक गैरसमज टाळावेत. आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील.

Advertisement