उच्च शिक्षण घ्यायचे तर खिशा रिकामा असून चालत नाही. त्यातही परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे म्हटले तर सर्वसामान्यांसाठी सोपी गोष्ट नाही.. बुद्धीमत्ता असूनही केवळ पैशाअभावी अनेक जण उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.
मात्र, आता तसे होणार नाही.. तुमच्याकडे बुद्धीमत्ता असेल, परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची आस असेल, तर आता तुमचे स्वप्न साकार होणार आहे. अनेक बॅंका अशा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देतात. मात्र, बऱ्याच जणांना त्याची माहिती नसल्याने उच्च शिक्षणापासून वंचित राहतात..
देशातील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल, किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेऊन अभ्यास पूर्ण करू शकता.
अनेक बँका किंवा खासगी संस्था उच्च शिक्षणासाठी कर्ज देतात. त्याद्वारे गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतो. अर्थात त्यासाठी बँकेच्या काही अटी व शर्तींचे पालन करावे लागते. चला तर मग शैक्षणिक कर्जासाठीची प्रोसेस जाणून घेऊ या..
शैक्षणिक कर्जाचे प्रकार
करिअर एज्युकेशन लोन (Career Education Loan)
सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊन विद्यार्थ्याला करिअर करायचे असेल, तर असा विद्यार्थी ‘करिअर एज्युकेशन लोन’ घेऊ शकतो.
प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन (Professional Graduate Student Loan)
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण सुरु ठेवण्यासाठी ‘प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन’ घेता येते.
पालक कर्ज (Parents Loan)
मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालकाला बँक वा खासगी संस्थेकडून कर्ज घेता येते.
अंडर ग्रॅजुएट लोन (Under graduate Loan)
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, देशात आणि परदेशात पदवी मिळविण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.
आवश्यक कागदपत्रे..?
वयाचा पुरावा
पासपोर्ट साइज फोटो
मार्कशीट
बँक पासबुक
ओळखपत्र
रहिवाशी दाखला
कोर्स डिटेल्स
विद्यार्थी-पालकांचे पॅनकार्ड व आधारकार्ड
पालकांचा उत्पन्नाचा दाखला
कसे घेणार शैक्षणिक कर्ज..?
सर्वप्रथम कोणती बँक किंवा संस्था तुम्हाला कर्ज देऊ शकते, त्याची निवड करा. बॅंकेत वा संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाबाबत आवश्यक माहिती मिळवा. त्यांचे व्याजदर नीट समजून घ्या. बँकेच्या सर्व नियमांचे पालन करा. सगळी काही खात्री झाल्यावरच कर्जासाठी अर्ज करा.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511