SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील 4,554 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…

महाराष्ट्रातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतचा तसा पत्रव्यवहार राज्यामधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयोगाने केला आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान यांनी याबाबतची माहिती दिली.

निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. 21 डिसेंबर 2021 ला या निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी या पोटनिवडणुका (Grampanchayat Election) होत असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पोटनिवडणुकीचा कार्यक्रम:

▪️ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील.

Advertisement

▪️ नामनिर्देशन पत्रांची छाननी 7 डिसेंबर 2021 रोजी होईल.

▪️ नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 9 डिसेंबर 2021 आहे आणि याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

Advertisement

▪️ मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होईल. (गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल.)

▪️ मतमोजणी 22 मे 2021 रोजी होणार आहे.

Advertisement

▪️ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना काढण्याची तारीख 27/12/2021 आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानं देशातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यातच आता राज्यातील ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात असे आयोगाने सुचवलं आहे. कोरोना साथीच्या संसर्गाचा विचार करून आयोगाने काही सूचना देखील केल्या आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement