SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘गुगल-पे’वर आता बोलून पेमेंट करता येणार, ‘गुगल’कडून विविध फिचर्सची घोषणा..!

मोबाईल रिचार्ज असो, वा वीजबिल भरायचे, की कोणाला पैसे पाठवायचे असतील.. आता आपण ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ही कामे अगदी घरबसल्या करतो. सरकारही डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहे.

ऑनलाईन व्यवहारासाठी गुगल प्ले स्टोअरवर फोन-पे, पेटीएम, गुगल-पे, भीम अ‍ॅपसह अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक लोकप्रिय नि सुरक्षित अ‍ॅप म्हणजे गुगल-पे..

Advertisement

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुगल (Google) नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असते. भारतातील मोठा ग्राहक वर्ग डोळ्यासमोर ठेवून ‘गुगल फॉर इंडिया’ने नुकतीच नवीन फिचर्सची घोषणा केलीय. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या…

‘गुगल पे’मधील नवीन फिचर्स
‘गुगल पे’द्वारे (Google pay) दरवर्षी सुमारे १५०० कोटी रुपयांचे व्यवहार होतात. आता त्यात एक ‘स्प्लिट फीचर’ मिळणार आहे. त्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक जणांना पेमेंट करु शकाल. थोडक्यात ग्रुप पेमेंटची सोय मिळणार आहे. तसेच ‘गुगल पे’ २०२२ पासून ‘हिंग्लिश’ला (इंग्लिश+हिंदी) देखील सपोर्ट करणार आहे.

Advertisement

‘गुगल पे’मधील महत्वाचा बदल म्हणजे, ‘गुगल पे’द्वारे पैसे पाठविण्यासाठी आता खाते क्रमांक टाकण्याची गरज राहणार नाही. त्याऐवजी थेट बोलून खाते क्रमांक जोडता येणार आहे. शिवाय, ‘माय शॉप फीचर’ही ‘गुगल पे’मध्ये उपलब्ध असेल. त्याद्वारे दुकानदाराला दुकानातील साहित्याची यादी देता येईल.

यू-ट्यूब शॉर्ट्स लॉन्च (Youtube shorts)
सध्या शॉर्ट्स व्हिडिओ बनविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘यू-ट्यूब’ (Youtube) ने अधिकृतपणे ‘यू-ट्यूब शॉर्ट्स’ लॉंच केलेय. त्यात ६० सेकंदांपर्यंत व्हिडिओ तयार करता येतील, तसेच कॉपीराइट मुक्त संगीत वापरू शकतील, असे ‘गुगल’ने स्पष्ट केले आहे.

Advertisement

डिजिटल सर्टिफिकेट (Digital Certificate)
‘गुगल इंडिया’ने डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची घोषणा केलीय. ‘गुगल’चे डिजिटल प्रमाणपत्र शुल्क ६ ते ८ हजार रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी गुगलने ‘नासकाॅम फाउंडेशन’ (NASSCOM) आणि ‘टेक महिंद्रा’ यांच्यासोबत भागीदारी केली आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती कार्यक्रमही जाहीर केलाय.

गुगल असिस्टंट (Google Assistant)
कोरोना लसीकरणासाठी ‘गुगल असिस्टंट’चा वापर करता येईल. आता ‘गुगल असिस्टंट’द्वारे लसीच्या स्लॉट्सची उपलब्धता ट्रॅक केली जाऊ शकते.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement