SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 18 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : पराक्रमात वाढ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. कौटुंबिक गैरसमज टाळा.

वृषभ (Taurus) : शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती, नवीन संधी मिळतील. व्यवसाय धंद्यात अनेक लाभ होतील. एकूण आठवडा शुभ फळ देईल

मिथुन (Gemini): गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. संतती चिंता, पोटासंबंधी विकार त्रास देतील. प्रकृतीची काळजी घ्या. बचतीच्या योजना आखाव्यात.

कर्क (Cancer) : मुलांचा उत्साह वाढीस लागेल. आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. दुपारनंतर मात्र मन व्याकुळ होईल.

सिंह (Leo) : आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. पैसा टिकणार नाही. कार्यक्षेत्रात नेहमीपेक्षा अधिक काम पडेल. खर्चाला आवर घाला.

कन्या (Virgo): स्वभाव जरा रागीट होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात. व्यायामाचा आळस करू नका.

तूळ (Libra) : तुमच्या बुद्धीचा वापर करून एखाद्या नवीन कामाला गती द्याल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. बोलण्यात सौम्यता बाळगा.

वृश्चिक (Scorpio) : जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांची भेट मन प्रसन्न करेल. निष्काळजीपणा करू नका. चांगले मनोरंजन घडेल.

धनु (Sagittarius) : कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील. पराक्रम व चिकाटी वाढवेल. नवीन कलेमध्ये रुची निर्माण होईल.

मकर (Capricorn) : आशीर्वादाने आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. चुगलखोर व्यक्तींकडे दुर्लक्ष करावे.

कुंभ (Aquarius) : कामाची दिवसभर धावपळ राहील. एकूण मिश्र फळ देणारा सप्ताह आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल.

मीन (Pisces) : कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. वाहन चालवताना काळजी घ्या.

Advertisement