SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सुझुकीची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, ओला-बजाज चेतकला टक्कर, किंमत नि वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी वाचा..

वाढत्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा कल ईलेक्ट्रीक वाहनांकडे वळला आहे. केंद्र सरकारही त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. मागील काही काळात भारतात विविध कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणल्या असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement

हीच बाब ओळखून ‘सुझुकी मोटरसायइल इंडिया’ कंपनी भारतात आज (ता. 18 नोव्हेंबर) नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. कंपनीने स्कूटरच्या नावाची घोषणा केलेली नाही. बजाज चेतक (Bajaj Chetak) आणि ओला एस-१ (Ola S1) स्कूटरसोबत तिची स्पर्धा होणार आहे.

लाँचिंगआधी सुझुकीने आपल्या नवीन स्कुटरचा टीझर व्हिडिओ रिलीज केलाय. स्पोर्टी स्टाईलमध्ये ही स्कुटर असेल. हँडलबारवर ब्लिंकर्स असतील. पुढील भागात फ्रंट मेन हेडलँप असेम्ब्ली देण्यात आलीय. डार्क कलर थीमच्या बेसवर ‘नियॉन येलिश’ हायलाईटचा वापर केला आहे.

Advertisement

सुझुकीची ही स्कूटर त्यांच्या प्रसिद्ध ‘बर्गमन मॅक्सी-स्कूटर’चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट असेल, असे म्हटले जात होते. परंतु हे व्हेरिएंट जपानी ऑटोमेकरच्या मॅक्सी-स्कूटरसारखे दिसत नाही.

स्कुटरची वैशिष्ट्ये
स्कूटरला पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले असतील. हा डिस्प्ले स्मार्टफोनद्वारे ब्ल्यू टूथशी कनेक्ट केला जाऊ शकतो. याद्वारे स्कूटर अनेक बाबतीत कनेक्ट राहणार आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज 100 ते 150 किलोमीटरच्या आसपास असेल.

Advertisement

सध्या भारतीय बाजारात ओला एस-१ आणि ‘टीव्हीएस आयक्यूब’ स्कूटर प्रसिद्ध आहेत. पैकी ‘टीव्हीएस’ची स्कूटर रस्त्यांवर धावतेय, तर ओलाची स्कूटर यायला अजून वेळ आहे. सध्या तिची टेस्ट राईड दिली जात आहे.

किंमत किती असेल..?
ओला आणि अन्य इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीतच सुझुकीच्या या स्कूटरची किंमत असण्याची शक्यता आहे. भारतात 1 लाख ते 1 लाख 20 हजार रुपयांच्या आसपास स्कुटरची किंमत राहणार असल्याचे सांगितले जाते.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement