SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयफोन-13’ सर्वसामान्यांच्या आवाक्यात..! इथे मिळतोय घसघशीत डिस्काऊंट, जाणून घेण्यासाठी वाचा..

स्मार्टफोनमधील सर्वाधिक ‘लग्झरीयस् डिव्हाइस’ म्हणजे, आयफोन..! अनेकांचे आयफोन खरेदीचं स्वप्न असतं. परंतु, त्याचा ‘भार’ खिशाला पेलणारा नसतो.. आयफोनची किंमत आवाक्याबाहेर असल्याने आयफोन खरेदीचे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते..

स्मार्टफोन युजर्ससाठी ‘आयफोन-१३’ हा कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय. सप्टेंबरमध्ये ‘अ‍ॅपल’ने (Apple iphone -13) ‘आयफोन-१३ सीरिज’ लाॅंच केली. त्यात ‘आयफोन १३ मिनी’, ‘आयफोन १३’, ‘आयफोन १३ प्रो’ आणि ‘आयफोन प्रो मॅक्स’ लॉंच करण्यात आले होते.

Advertisement

‘आयफोन-१३’ खरेदी करण्याचा विचार असेल, तर सध्या चांगली संधी आहे. कारण, ‘अ‍ॅपल’ने ‘आयफोन-१३ सीरिज’वर चक्क घसघशीत सूट दिलीय. त्यामुळे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

किती रुपयांत मिळेल आयफोन..?
सध्या ‘आयफोन १३’ या १२८ जीबी मॉडेलची किंमत ५५,९९० रुपयांत खरेदी करता येणार आहे. ‘अ‍ॅपल डिस्ट्रिब्युटर’ची अधिकृत वेबसाइट IndiaiStore.com वर मोठी सूट देण्यात आली आहे.

Advertisement

स्टोअरमधून ‘आयफोन-१३’ खरेदी करताना ‘एचडीएफसी बॅंके’च्या (HDFC) कार्डने पेमेंट केल्यास ६००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. ‘ईएमआय’ पर्याय निवडला, तरी ही सवलत मिळणार आहे. शिवाय चांगल्या स्थितीतील जुना आयफोन विकणार असाल, तर १८ हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे.

भारतात ६४ जीबी ‘आयफोन एक्सआर’ची एक्सचेंज किंमत १८ हजार रुपये आहे. ‘आयफोन-११’ किंवा हायर मॉडेलवर ३ हजार रुपये ‘एक्सचेंज इन्सेन्टिव’ मिळू शकतो. त्यामुळे ‘आयफोन-१३’ ची किंमत ५५,९९० रुपये होईल.

Advertisement

अ‍ॅपलच्या अधिकृत ट्रेन इन प्रोवाइडर्स Cashify आणि Servify वर ‘एक्सचेंज ऑफर’ लागू आहे. ‘आयफोन मिनी’, ‘आयफोन १३ प्रो’ आणि ‘आयफोन प्रो मॅक्स’वरही मोठी सूट मिळेल. ‘आयफोन १३ मिनी’ (४५,९००), ‘आयफोन १३ प्रो’ (९६,९००), ‘आयफोन १३ प्रो मॅक्स’ची किंमत १,०६,९०० रुपये आहे.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement