SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खूशखबर! शेतकऱ्यांचा 10वा हप्ता खात्यात येण्यासोबतच मिळणार ‘हे’ 3 मोठे फायदे..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. 10वा हप्ता लवकरच जारी केला जाणार आहे. दरम्यान 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात टाकले जाणार आहेत.

मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांना देत असलेली रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये मिळू शकतात. याचबरोबर सरकार आणखी तीन फायदे देण्याचं नियोजन करतंय.

Advertisement

किसान क्रेडिट कार्ड (KCC-kisan credit card)

पीएम किसान योजनेशी आता किसान क्रेडिट कार्ड योजना सुद्धा जोडली जाईल. केसीसी बनवण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून हे करण्यात आले आहे. म्हणजेच सरकार ज्याला 6000 रुपये देत आहे, त्यांना KCC बनवणे सोपे होणार आहे. सध्या सुमारे 7 कोटी शेतकऱ्यांकडे KCC आहे, सरकारला या योजनेमध्ये लवकरात लवकर आणखी लोकांना समाविष्ट करायचे आहे आणि त्यांना 4 टक्केवर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे.

Advertisement

पीएम किसान मानधन योजना

जर कुणी शेतकरी पीएम किसान (PM Kisan) सम्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी वेगळे कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. कारण अशा शेतकऱ्याची संपूर्ण कागदपत्रे भारत सरकारकडे आहेत. या योजनेअंतर्गत, शेतकरी पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे त्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याचा प्रीमियम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या हप्त्यांच्या रकमेतून कापला जाईल.

Advertisement

किसान कार्ड बनवण्याची योजना

केंद्र सरकार पीएम किसान योजनेच्या डेटावर आधारित शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी (Unique farmer ID) तयार करण्याच्या तयारीत आहे. पीएम किसान आणि राज्याद्वारे बनवण्यात येत असलेल्या भूमी रेकॉर्ड डेटाबेसशी लिंक करून हे ओळखपत्र बनवण्याची योजना आहे. यानंतर शेतीशी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सोईस्कर होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement