भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. झारखंडमधील रांचीच्या मैदानावर आज (ता. 19 नोव्हेंबर) पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
दरम्यान, मॅचला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, आता ही मॅच अडचणीत आलीय. झारखंड राज्य क्रिकेट संघाच्या जेएससीए स्टेडिअममध्ये होणारा दुसरा सामना रद्द करण्याच्या मागणीसाठी झारखंड उच्च न्यायालयाचे अधिवक्ता धीरज कुमार यांनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.
याचिकेत काय म्हटलंय..?
देशात नुकतीच कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली. असे असताना, जयपूरमधील पहिल्या सामन्यात मोठ्या प्रमाणात कोविड नियमांचे उल्लंघन झाले. राजस्थान सरकारने सुरुवातीला 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी दिली होती. मात्र, नंतर हा निर्णय मागे घेत आयोजकांना सर्व सीट बुक करण्याची परवानगी दिली.
झारखंडमध्येही तसे होण्याची शक्यता असल्याने, ही मॅच रद्द करावी किंवा स्टेडिअममधील प्रेक्षक क्षमतेवर मर्यादा आणावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सोबतच या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.
जयपूरमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन
जयपूरमध्ये आठ वर्षांनी झालेली मॅच पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. मात्र, त्यापैकी अर्ध्याहून अधिक प्रेक्षकांच्या तोंडाला मास्क नव्हता. विशेष म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक ‘व्हीआयपी’ लोक मॅच पाहण्यासाठी आलेले होते, पण त्यांच्याही चेहऱ्याला मास्क नव्हता.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनं मॅचच्या तिकीटावरच मास्क घालणे अनिवार्य असल्याची सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही प्रेक्षकांपासून ते व्हीआयपीपर्यंत अनेकांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचेच दिसून आले..
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511