SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महत्वाचं! पॅन कार्डवरील फोटो आणि स्वाक्षरी चुकली असेल, तर काय करायचं? ती कशी बदलावी? वाचा..

देशात आधार कार्ड (Aadhaar Card) सोबतच आता सध्याच्या काळात पॅन कार्ड देखील नागरिकांसाठी महत्त्वाचं कागदपत्र ठरत आहे. पॅन कार्डमध्ये असलेल्या 10 अंकी Alphanumeric कोड च्या माध्यमातून सदर व्यक्तीच्या आर्थिक व्यवहार, उलाढाल याची माहिती ठेवता येते. आयकर भरणाऱ्यांसाठीही पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

नोटबंदी आणि जीएसटी (GST) लागू झाल्यानंतर पॅन कार्डचा वापर अधिक वाढला आहे. बँकांमध्ये देखील ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे असते. ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळं त्यात नागरिकाची योग्य माहिती असणं आवश्यक आहे.

Advertisement

कर घेण्याआधी लक्षात ठेवा की, जर पॅन कार्डमध्ये (PAN Card) काही दोष अथवा चूक असेल तर संबंधित व्यक्तीला एखादी बँक कर्ज देत नाही. त्यासाठी त्यात असलेला फोटो आणि स्वाक्षरी ही अचूक (pan card photo and signature correction) असायला हवी. जर ती बरोबर नसेल तर ते करेक्शन तात्काळ करणं गरजेचं आहे. म्हणून या चुका कशा दुरुस्त करता येईल, वाचा..

पॅनकार्डवरील फोटो आणि स्वाक्षरी कशी बदलायची ? (How to change your photo & Signature on PAN Card?)

Advertisement

▪️ सर्वात आधी पॅन कार्डची अधिकृत वेबसाईट NSDL ओपन करा किंवा https://tin.tin.nsdl.com/pan/changerequest.html या लिंकवर क्लिक करून पुढील प्रोसेस करा. तसेच
https://tin.tin.nsdl.com/pan/correctiondsc.html या लिंकवर जाऊनही तुम्ही अधिक माहिती घ्या.

▪️ Application च्या पर्यायावर क्लिक करा आणि मग Correction च्या ऑप्शनला (pan card application form) सिलेक्ट करा.

Advertisement

▪️ Menu Category मध्ये Personal हा पर्याय निवडा. तुम्हाला ज्या माहितीचं करेक्शन करायचं आहे ती माहिती अचुक भरा.

▪️ आता PAN Application वर क्लिक करून KYC च्या पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

▪️ स्क्रिनवर Photo Mismatch and Signature Mismatch असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून योग्य फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

▪️त्यानंतर Parents (आई/वडील वगैरे) ची योग्य माहीती भरून नेक्स्ट बटनवर क्लिक करा.

Advertisement

▪️ माहिती भरल्यावर संबंधित व्यक्तीला ओळखपत्राचा पुरावा द्यावा लागेल.

▪️ आता भरल्यानंतर Declaration या नावावर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा.

Advertisement

भारतामध्ये पॅन कार्ड दुरूस्त करण्यासाठी 101 रुपये शुल्क घेतले जाते आणि भारताबाहेर जर तुम्ही पॅन कार्डची दुरूस्ती केली तर तुम्हाला त्यासाठी 1011 रूपये आकारले जाणार आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून NSDL च्या ऑफीसला पोस्ट करा. त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला दुरूस्त झालेले पॅन कार्ड पोस्टानं येऊन जाईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement