राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण बऱ्यापैकी आटोक्यात आलेय. त्यामुळे राज्यात शाळा-महाविद्यालये सुरु झाली आहेत, मंदिरांचे दार उघडले आहे, एसटी-रेल्वे, बाजार सुरु झाले आहेत. सगळं काही पुर्ववत होत असताना राज्य सरकार आता आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झालेले आहेत. आता राज्यातील शाळा पहिलीपासून सुरु करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाकडूनही तसे संकेत मिळत आहेत.
गेल्या दीड वर्षापासून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंड पाहिलेले नाही. मात्र, आता या विद्यार्थ्यांनाही शाळेत बोलाविले जाणार आहे. अर्थात, राज्य मंत्रीमंडळ व टास्क फोर्स यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरच शालेय शिक्षण विभाग अंतिम निर्णय घेणार आहे.
दरम्यान, राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात निर्णयाचा चेंडू गेला आहे.
मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय
सध्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील काही दिवसांत पहिलीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे कळते.
प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याचे समजते. परंतू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर येत्या १५ दिवसांत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झालेले आहेत, पण आता पहिलीपासूनच वर्ग सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षक, शाळाचालक, पालकही आग्रही असल्याचे दिसते.
विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडिज
शाळा बंद असल्यामुळे आधीच विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. 60 टक्के विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटिबॉडिज असतात. त्यामुळे सध्या शाळा सुरु करण्यात कोणतही अडचण नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अनेक मुलांना आधीच कोरोनाची लागण झाली नि ते ठिकही झाले आहेत. काही मुलांमध्ये तर कोरोनाची लक्षणेही आढळली नाहीत. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511