SpreadIt News | Digital Newspaper

पाकिस्तानचा बांगलादेशमध्ये राडा! खेळायला गेले आणि मैदानावर केलं ‘हे’ कृत्य…

टी-20 विश्वचषकानंतर आता पाकिस्तानची क्रिकेट टीम 3 टी- 20 मॅचच्या मालिकेसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तानच्या कृतीनं संतापलेल्या बांगलादेशी फॅन्सनं ही मालिका रद्द करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानच्या टीमने काय केलं?

Advertisement

पाकिस्तानच्या टीमनं एका सराव सत्रापूर्वी मीरपूरच्या मैदानात पाकिस्तानचा झेंडा लावला होता. त्यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यापूर्वी अनेक विदेशी टीमनी क्रिकेट मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा केला आहे. पण, त्यांनी आजवर सराव सत्रात त्यांच्या देशाचा झेंडा लावलेला नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं हा विरोध सुरू होताच स्पष्टीकरण देताना म्हटलं की, गेल्या 2 महिन्यांपासून टीम अभ्यास सत्रात त्यांच्या देशाचा झेंडा लावून खेळत आहे, असं म्हटलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं मात्र या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी सरावावेळी पाकिस्तानचा झेंडा लावू नये, लावलेला झेंडा काढून टाकावा, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

पाकिस्तानने सराव सत्राच्या दरम्यान लावलेला झेंडा काढावा अशी मागणी फॅन्सनी केली आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांनी टीका करत म्हटलंय की, पाकिस्तानी संघाने मुद्दाम खोडसाळपणा करत बांगलादेश स्वतंत्र होण्याच्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाआधी हे राजकीय हेतूने कृत्य केल्याचंही म्हटलं आहे.

तरी अनेक युझर्सनी ही कृती लाजीरवाणी असल्याचं सांगत या प्रकारावर बंदी घालावी आणि पाकिस्तान विरुद्धची मालिका रद्द करावी अशी मागणी केली आहे. सध्या पाकिस्तानचा संघ भलताच फॉर्ममध्ये दिसत असून दमदार कामगिरी करत आहे. पाकिस्तानच्या संघाने टी-20 विश्वचषकामध्ये साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून दुसऱ्या गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत एंट्री केली होती. मात्र उपांत्यफेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केलं होतं.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement