खरेदीखत म्हटलं की नावातच समजतं की खरेदी करण्याविषयीचं कागदपत्र मग ते शेतीचे असो की घर बांधण्यासाठी जमिन खरेदी व्यवहाराचं असो! असा हा शब्द आपल्या कानावर बऱ्याच वेळा पडत असतो. परंतु खरेदीखत का करतात? ते नेमकं असतं तरी काय? त्याचा फायदा तरी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू..
खरेदीखत म्हणजे काय?
जमिनीचा व्यवहार करताना जी रक्कम जमीन घेणारा आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली आहे. ती रक्कम देऊन व्यवहार पूर्ण होतो आणि त्याचा पुरावा किंवा आपल्याकडे नोंद राहावी म्हणून खरेदीखत करतात. खरेदीखत झाल्यावर त्या संबंधित जमिनीचे मालकी हक्क हस्तांतरीत केले जातात. थोडक्यात एखादी जमीन खरेदी केल्याच्या नंतर तिचा व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा म्हणजेच खरेदीखत असतं. जमिन खरेदी-विक्री यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. हे बदल करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असतात.
जमीन खरेदी-विक्री करताना तुम्हाला जमिनीचा सध्याचा बाजारभाव काय चालू आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून खरेदीखतासाठी सर्वप्रथम मुद्रांक शुल्क (Stamp duty) हे काढून घ्यावे लागते. यासाठी ज्या गाव-भागामध्ये जमीन आहे त्या क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन (Evaluation) करून मुद्रांक शुल्क काढून घ्यावे. दुय्यम निबंधक हा मूल्यांक शुल्क काढून देतात.
मुद्रांक शुल्क काढल्यावर दुय्यम निबंधक खरेदी खत दस्तऐवजासाठी आवश्यक नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. तसेच खरेदी अथवा विक्री करावयाच्या जमिनीचे सर्वे नंबर (Survey number), जमिनीचा प्रकार, जमिनीच्या मालकाची नावे, जमिनीचे क्षेत्र, जमीन खरेदी करण्याचे व विकणाऱ्याचे प्रयोजन इ. सर्व दुय्यम निबंधकाने (Secondary registrar) ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद करावे लागते.
खरेदीखत करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
खरेदीखत तयार करण्यासाठी सात बारा (७/१२), मुद्रांक शुल्क, ८-अ, मुद्रांक शुल्काची पावती, प्रतिज्ञापत्र, फेरफार, दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो, NA ऑर्डर ची प्रत ही कागदपत्रे जोडून याबरोबर डाटा एन्ट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी सादर करावा लागतो. ज्या गावात आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे, तपासून घ्यावेत.
खरेदीखत करण्यापूर्वी जमीन खरेदी करणार्याने जमीन मालकाशी ठरवल्याप्रमाणे जमिनीची सर्व रक्कम पूर्ण करायची असते. जर सर्व रक्कम पूर्ण झाली नसेल तर खरेदीखत करू नये. कारण एकदा खरेदीखत झाले की नंतरचा जमीन मालक हा त्या जमिनीवरचा मालकी हक्क काढून घेत असतो. खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511