SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संयमी राहून बोलणे चांगले असेल. या राशीच्या लोकांना आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल.

वृषभ (Taurus) : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करावा. कोणतेही साहस करतांना सावध राहावे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे.

मिथुन (Gemini): केलेल्या कामाचा आनंद मिळेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. मित्रांसोबत दिवस चांगला जाईल.

कर्क (Cancer) : नोकरी धंद्यात सहकार्‍यांचे सहकार्य चांगले मिळेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज मनातील बोलता येईल.

सिंह (Leo) : अति भावनाशील होऊ नका. आज आपली सृजनशक्ती अधिकच चमकेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्यविश्वाची सफर कराल.

कन्या (Virgo): दिवसाची सुरुवात चांगली होईल. लोकांकडून आपल्याला आपुलकीची भावना दिसेल. कामात धनप्राप्ती होईल.

तूळ (Libra) : आज हसण्यात घालवला जाईल. फक्त आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या.

वृश्चिक (Scorpio) : नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आज चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत सकारात्मक परिणाम पाहता येतील.

धनु (Sagittarius) : कौटुंबिक आनंद मिळेल आणि दिवस चांगला जाईल. जर तुम्ही हुशारी वापरून काम केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल.

मकर (Capricorn) : तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. मानसिक थकवा जाणवेल. घरगुती बाबींची चिंता राहील.

कुंभ (Aquarius) : कामासाठी दिवस चांगला असणार आहे. मूड चांगला राहील. प्रवासाचा योग आहे. नोकरीत नवीन काही तरी शिकायला मिळेल.

मीन (Pisces) : मन प्रसन्न असेल. व्यापाऱ्यांना सामाजिक वर्तुळ वाढवण्यावर भर द्यावा लागेल. धैर्य ठेवा त्याचप्रमाणे प्रयत्न चालू ठेवा.

Advertisement