SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रावणच जगातला पहिला पायलट, ‘पुष्पक’ विमान हे सत्य; श्रीलंकेत संशोधनाला सुरुवात..!

विमानाचा शोध कुणी लावला, असा प्रश्न विचारला, तर अनेक जण त्याचे उत्तर ‘राईट बंधू’ हेच देतील, पण श्रीलंकेतल्या लोकांना ते मान्य नाही. कारण, जगातलं पहिलं विमान (पुष्पक) हे रावणाचं होतं, तोच जगातला पहिला पायलट असल्याचा ठाम दावा श्रीलंकन लोकांनी केला आहे..

श्रीलंकन नागरिक तेवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर जगात सर्वप्रथम रावणानेच विमानाचा वापर केला, हे सिद्ध करण्यासाठी श्रीलंकेत आता त्यावर विशेष संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आलाय…

Advertisement

रामायणाला भारतात एक विशेष महत्व आहे.. तसेच श्रीलंकन नागरिकही ‘रामायण’ हे मिथक नसून, सत्य कथा असल्याचे मानतात.. वनवासात असलेल्या सीतेच्या अपहरणासाठी रावणाने ‘पुष्पक’ विमानाचा वापर केला होता, अशी सर्वश्रूत कथा आहे.

सीतेला पळवून नेण्यासाठी रावणाने जगातलं पहिलं विमान चालवलं.. रावण श्रीलंकेचा सत्ताधीश असताना, त्याच्याकडे स्वत:चे विमान नि विमानतळही असल्याचा दावा श्रीलंकेचे नागरिक करतात.

Advertisement

कोलंबोत दोन वर्षांपूर्वी नागरी हवाई तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्त्व शास्त्रज्ञ, भूवैज्ञानिकांची एक परिषद झाली होती. त्यात रावणाने भारत ते श्रीलंका हा प्रवास विमानानेच केला होता, असा निष्कर्ष काढण्यात आला. रावणाच्या ‘पुष्पक’ विमानाच्या पुराव्याचा शोध घेण्यासाठी संशोधन करण्याचे ठरले होते.

श्रीलंकन सरकारने त्यानुसार या संशोधनासाठी 50 लाख श्रीलंकन रुपये मंजूर केले. मात्र, नंतर कोविडमुळे या संशोधनाला ब्रेक लागला होता. आताच्या राजपक्षे सरकारलाही या संशोधनात रस आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे संशोधन हाती घेण्यात आले आहे.

Advertisement

भारताने संशोधनासाठी साथ द्यावी
श्रीलंकेच्या नागरी हवाई वाहतूक प्रधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दाणातुंगे म्हणाले, की “रावण हे पुराणातील पात्र नसून, खरा राजा होता. त्याच्याकडे स्वत:चे विमान नि विमानतळही होते. त्यावर वस्तुनिष्ठ संशोधन होणं गरजेचं असून, त्यासाठी भारतानेही आम्हाला साथ द्यावी.”

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement