SpreadIt News | Digital Newspaper

भारतीय संघ पराभवाचा वचपा काढणार, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या…

यूएईमध्ये टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup) नुकतीच सांगता झाली. या स्पर्धेच्या फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाने तगड्या न्यूझीलंडला मात देत स्पर्धा जिंकली. विश्वचषक विजयाची नोंद करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथमच टी-20 विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे. क्रिकेटच्या विश्वातील विविध देशांसोबत भारत 4 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 14 T-20 सामने खेळणार आहे. ज्यातील सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांनी होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ भारतात चार देशांना खेळण्यासाठी आमंत्रित केलं आहे. यामध्ये न्यूझीलंडचा संघ, धडाकेबाज वेस्ट इंडिज, जिद्दीने खेळणारा दक्षिण आफ्रिका आणि कुशलरित्या श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्वच सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले असून BCCI ने याबद्दल अधिक माहिती दिली आहे. टीम इंडियाचं पुढचं वेळापत्रक कसं असेल आणि न्यूझीलंडविरुद्ध आता भारत पुन्हा क्रिकेटच्या टी-20 सामन्यात, कसोटी मालिकेत बॉस होणार का, हे बघणे महत्वाचं असणार आहे.

Advertisement

भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या (india vs newzeland T-20, ODI, Test matches) दौऱ्याला 17 नोव्हेंबर 2021 पासून सुरुवात होणार आहे. आधी तीन टी-20 आणि नंतर 2 कसोटी सामने खेळवले जातील. तसेच भारतीय क्रिकेट संघामध्ये मागच्या काही काळापासून जे बदल झाले, त्यानुसार टी-20 साठीचा भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा काम पाहिल. प्रशिक्षक पद रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविडकडे देण्यात आलं आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

Advertisement

कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

टी-20 मालिका: टीम इंडियाचं वेळापत्रक-

Advertisement

1) बुधवारी 17 नोव्हेंबर, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, सायंकाळी 7 वाजेपासून सुरू होणार आहे.
2) शुक्रवार, 19 नोव्हेंबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम रांची, सायंकाळी 7 वाजेपासून सुरू होणार आहे.
3) रविवार-21 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता, सायंकाळी 7 वाजेपासून सुरू होणार आहे.

कसोटी-मालिका: टीम इंडियाचं वेळापत्रक:

Advertisement

▪️ पहिला सामना, 25 ते 29 नोव्हेंबर, ग्रीन पार्क कानपूर, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
▪️ दुसरा सामना, 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर, वानखेडे स्टेडियम मुंबई, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement