SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला जवान, पाकिस्तानी तरुणीलाच पाठवली गोपनीय माहिती!

बिहार एटीएसने (Bihar ATS) बिहार राज्यातील पाटणा येथील दानापूरमधील ( Danapur) एका सैन्याच्या अधिकाऱ्याला अटक केल्याचं समजतंय. त्याच्या अटकेचं कारणही तसच मोठं आणि धक्कादायक आहे. या अधिकाऱ्याकडून पाकिस्तानमधील एका व्यक्तीला संवेदनशील माहिती आणि कागदपत्रे पाठवण्यात येत होती.

एएसपी सैयद इम्रान मसूद यांनी म्हटलं आहे की, प्राप्त माहितीनुसार, बिहारच्या दहशतवाद विरोधी पथकाने एका पाकिस्तानी व्यक्तीला गोपनीय माहिती लीक करण्याच्या आरोपाखाली एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. या आरोपीचं नाव जनार्दन प्रसाद सिंह असल्याचं म्हटलं आहे. इंटेलिजन्स ब्यूरोद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही अटक करण्यात आली आहे. कार्यालयीन गोपनीयतेच्या कायद्याचं हे उल्लंघन असून त्याअंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे., असं ते म्हणाले.

Advertisement

प्रकरण जाणून घ्या…

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी हँडलरला गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी या लष्करी अधिकाऱ्याला पाटण्यात (Patna) अटक करण्यात आली होती. या अधिकाऱ्याने आपल्या सैन्याच्या युनिटमधील संवेदनशील डॉक्यूमेंट्स पाकिस्तानमधील एका व्यक्तीला पाठवत असल्याची तशी कबूली दिली आहे. आरोपीने कबूल केले की, त्याने एका पाकिस्तानी महिलेशी बातचित करताना दानापूर छावनीच्या संबंधित काही माहिती शेअर केली आहे.

Advertisement

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने एका पाकिस्तानी महिलेसोबत आर्मी कॅन्टोन्मेंट दानापूरची माहिती शेअर केली होती. बिहार एटीएसचा असा विश्वास आहे की नालंदा जिल्ह्यात राहणारा आणि दानापूर छावनीमध्ये तैनात असणारा या अधिकाऱ्याला एका पाकिस्तानी महिलेने हनी ट्रॅप केले होते.

अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, कदाचित या पाकिस्तानी महिलेने देशातील सैन्याबाबतची गोपनीय माहिती शेअर करण्यासाठी ब्लॅकमेल केलं होतं. या आरोपीने त्या महिलेसोबत काही गोपनीय दस्तऐवज देखील शेअर केले आहेत. अटक केलेल्या लष्कराच्या जवानाची सध्या पाटणा येथील खगौल पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement