अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु, ‘या’ फॉर्म्युल्यानुसार दिले जाणार प्रवेश, असे करा रजिस्ट्रेशन..!
दहावीचा निकाल लागून बरेच दिवस झाले असले, तरी अजूनही अकरावी प्रवेशाचे भीजत घोंगडे सुरुच आहे. ऑनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवूनही अनेक ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आणखी एका फेरीचा घाट घालण्यात आला आहे.
राज्यात अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी संपल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले होते. तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) अशा प्रकारे यंदा अकरावीसाठी प्रवेश देण्यात आले.
पुणे-मुंबईसह नागपूर, नाशिक, अमरावती विभागात 1४९७ ज्युनिअर कॉलेज आहेत. त्यात अकरावीसाठी 5 लाख ३५ हजार ७१० जागा उपलब्ध होत्या. मात्र, केवळ 3 लाख ६४ हजार १३४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले. अजूनही 1 लाख ७१ हजार ५७६ जागा रिक्त राहिल्या आहेत.
दुसरीकडे आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश घेता न आलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाबाबत अजूनही विचारणा होत होती. त्यामुळे नव्याने आणखी एक फेरी राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शिक्षण संचालनालयाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फॉर्म्युल्यानुसार पुन्हा एकदा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत नव्याने नोंदणी अर्ज भरावा लागेल.
अर्ज कसा करायचा..?
सुरुवातीला 11thadmission.org.in या वेबसाइटवर जाऊन होम पेजवर ‘New Registration’ टॅबवर क्लिक करा.
सर्व आवश्यक माहिती भरा. सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा आणि अकरावीसाठीचा अर्ज सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करुन ठेवा.
महत्त्वाच्या तारखा
16 नोव्हेंबर सकाळी 10:00 ते 22 नोव्हेंबर, दुपारी 12:00 – नवीन विद्यार्थी नोंदणी, अर्जाचा फॉर्म भाग-1 भरणे, DYDE मध्ये फॉर्म पडताळणी, प्रवेश रद्द करणे आणि कोटा रिक्त जागा सरेंडर करणे. तसेच याच कालावधीत विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अंतर्गत अर्ज करून ऑनलाइन वाटप केले जाईल. त्यासाठी ‘Participate in FCFS’ वर क्लिक करा.
अर्ज वाटप केलेले विद्यार्थ्यांना ‘प्रवेशासाठी पुढे जा’वर क्लिक करा. वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात तुमचा प्रवेश निश्चित करा. कोटा प्रवेश आणि द्वि-फोकल प्रवेश सुरू राहतील.
22 नोव्हेंबर 2021 रात्री 08:00 पर्यंत- कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची स्थिती अपलोड करण्यासाठी अतिरिक्त वेळ.
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511