SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यवहारी दृष्टिकोन बाळगावा. विचारपूर्वक सल्ला द्या. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही प्रगत व्हाल.

वृषभ (Taurus) : पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरावा करा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला यश मिळेल.

मिथुन (Gemini) : ऐनवेळी येणार्‍या समस्या सोडवता येतील. आरोग्याची काळजी घ्यावी. तुमच्या कामगिरीमुळे तुमचे कौतुक होईल. निर्णय क्षमतेत वाढ होईल.

कर्क (Cancer): धार्मिक गोष्टीत स्वत:ला रमवाल. जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

सिंह (Leo) : आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात. आर्थिक बाजू मजबूत होईल.

कन्या (Virgo): कार्य सिद्धीस साशंकता नको. स्नेही आणि कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

तूळ (Libra) : आध्यात्मिक कामात रुचि वाढेल. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल. यात्रा सहलीचे योग आहेत. हा काळ शुभ राहील. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक (Scorpio) : आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. नोकरी आणि व्यवसायात नफा होईल.

धनु (Sagittarius) : मानसिक आरोग्य टिकवाल. नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवाल. विवाहित जीवन आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी संघर्ष आणि कौटुंबिक कलह टाळावा.

मकर (Capricorn) : प्रतिस्पर्धी तसेच छुपे शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. प्रवासाचे योग येऊ शकतात, परंतु आपण आपल्या ओळखीच्या लोकांपासूनच सावधगिरी बाळगली पाहिजे.

कुंभ (Aquarius) : कचेरीत सहकार्य चांगले मिळेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील. चिकाटी सोडून चालणार नाही. मानसिक तणाव, कोर्टकचेरी किंवा वादांना सामोरे जावे लागू शकते.

मीन (Pisces) : मनोरंजनाची साधने आणि वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. पैशाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement