SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ठाकरे सरकार घेणार सलमान खानची मदत, आरोग्यमंत्री टोपे यांची महत्वपूर्ण माहिती..

मागील काही दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. राज्यात मोठ्या संख्येने कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. मात्र, अजूनही कोरोना लसीबाबत समाजात अज्ञान आहे. त्यामुळे कोरोना लसीचा साठा पडून असतानाही अनेक जण डोस घेत नसल्याचे समोर आले आहे.

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. मुंबईत तर 100 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, अजूनही अडीच कोटी जनतेला लसीचा पहिला डोस द्यायचे बाकी आहे. लसीसाठी कायद्यानुसार कोणावरही सक्ती करता येत नाही. त्यासाठी जनजागृती करावी लागणार आहे.

Advertisement

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ठाकरे सरकार भाईजान अर्थात बाॅलिवूड स्टार सलमान खान याची मदत घेण्याचा विचार करीत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की औरंगाबादसारख्या काही जिल्ह्यात लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे. काही लोकांच्या मनात लसीकरणाबाबत गैरसमज पसरले असून, ते निराधार आहेत. हा अंधविश्वास आहे, अज्ञान आहे. ते दूर होणं गरजेचे आहे.

Advertisement

सलमान खानची मदत घेणार
जनतेला लसीकरणाबाबत जागृत करण्याची गरज आहे. त्यासाठी सलमान खानसारख्या सुपरस्टारची मदत घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. सलमान खानचे फॅन फाॅलोअर्स मोठ्या संख्येने असल्याने, त्याचा लसीकरणासाठी फायदा हाेईल.

सलमान खानने कोरोना लस घेतलेला व्हिडीओ प्रसारित केल्यास त्याचे कोट्यवधी फॅन कोरोना लसीकरणासाठी पुढे येतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

Advertisement

दोन डोसमधील अंतर कमी हवे
ते पुढे म्हणाले, की “महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३५ टक्के आहे. या आकड्यात वाढ करायची असेल, लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असेल, दोन डोसमधील अंतर कमी करावे लागणार आहे. तसा प्रस्ताव ठाकरे सरकारने केंद्र सरकारला दिला आहे.”

कोव्हॅक्सिन लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे, तर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे आहे. हे अंतर कमी करता येईल का, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement