SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘रेडिमी नोट 11T 5G’ भारतात 30 नोव्हेंबरला होणार लॉंच.., किंमत नि फिचर्स जाणून घेण्यासाठी वाचा..!

मोबाईल वेड्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोन युजर्स ज्या दिवसाची वाट पाहत होते, ती घटीका समीप आलीय.. भारतात येत्या ३० नोव्हेंबरला रेडिमी नोट-11T 5G (Redmi Note 11T 5G) हा दमदार स्मार्टफोन लाॅंच होणार आहे.

रेडिमी कंपनीने याबाबतची अधिकृत घोषणा नुकतीच केलीय. रेडमी नोट सीरिजचाच हा स्मार्टफोन पुढील भाग असेल. आतापर्यंत ‘रेडमी नोट 11’ मालिकेतील तीन स्मार्टफोन चीनमध्ये लॉंच झालेत. त्यामध्ये ‘रेडमी-11’, ‘रेडमी नोट 11-प्रो’ आणि ‘रेडमी नोट 11 प्रो प्लस’ यांचा समावेश आहे.

Advertisement

रेडिमी कंपनीने आगामी फोनसाठी एक ‘मायक्रो साईट’ही लाईव्ह केलीय. चीनमध्ये आलेल्या रेडिमी नोट 11 5G (Redmi Note 11 5G) स्मार्टफोनचा ही री-ब्रँड व्हर्जन असण्याची शक्यता आहे.

Advertisement

भारतात येत्या 30 नोव्हेंबरला ‘रेडिमी नोट 11T ५G’ लॉंच होणार आहे. त्यात 5G फीचर, जूमस्टर प्रोसेसर, फास्ट चार्जिंग, स्विफ्ट डिस्प्ले आणि रॅम बुस्टर फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या स्मार्टफोनचा लूक नि शार्प कॅमेरा लक्षवेधी आहे.

‘रेडिमी नोट 11T ५G’ ची वैशिष्ट्ये
– हा स्मार्टफोन नावाप्रमाणेच 5G नेटवर्कला सपोर्ट करणार आहे.
– फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि रॅम बुस्टर फिचर्स असतील.
– अधिकृत वेबसाईटवर चंदेरी नि हिरव्या रंगात स्मार्टफोन दाखवलाय.

Advertisement

– बेस मॉडेलमध्ये ६४ GB स्टोअरेज असून, १२८ GB स्टोअरेज मॉडेलही उपलब्ध.
– ६.६ इंचाची फुल एचडी प्लस पॅनेल, रिजोल्यूशन २४०० x १०८० पिक्सल.

– ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सल, समोर १६ मेगापिक्सल कॅमेरा असून, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी त्याचा उपयोग होईल.
– स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर, तसेच 5000 mAh ची बॅटरी

Advertisement

संभाव्य किंमत
‘रेडिमी नोट 11T ५G’ ची अधिकृत किंमत समोर आलेली नाही, मात्र भारतात 6GB रॅम, 64GB स्टोअरेज असणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये असू शकते. या मोबाईलचे 6GB / 128GB आणि 8GB / 128GB स्टोअरेज व्हेरिएंट अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपयांमध्ये असू शकतात.

📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement