SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📱 आता व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही ऑनलाईन दिसायचं की नाही ठरवू शकता; येतंय भन्नाट फिचर..

💁🏻‍♂️ व्हॉट्सअ‍ॅप मागील एक वर्षापासून दरमहिन्याला दोन-तीन नवीन फिचर जारी करत आहे. सध्या, जर यूजर्सना त्यांचे Last Seen लपवायचे असेल तर त्यांना सेटिंगमध्ये जावे लागेल, त्यानंतर अकाउंटमध्ये जावे लागेल. तिथून प्रायव्हसीमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर येथे Last Seen चा पर्याय उपलब्ध आहे. परंतु त्याचे ‘Last Seen’ फीचर कधीकधी लोकांसाठी समस्या निर्माण करते.

📳 अलिकडेच WhatsApp ने वेब व्हर्जनवर मल्टीडिव्हाईस सपोर्ट जारी केला आहे, ज्यानंतर यूजर्स एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट वेगवेगळ्या डिव्हाईसवर एकाचवेळी अ‍ॅक्सेस करू शकतात. या नवीन अपडेटनंतर वेब व्हर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी फोन इंटरनेटसोबत कनेक्ट राहणे आवश्यक नाही.

Advertisement

😎 व्हॉट्सअ‍ॅप नवीन फिचर आणण्याच्या तयारीत..

👀 WhatsApp beta मध्ये एक नवीन अपडेट आले आहे जे यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी आहे. या नवीन अपडेटनंतर यूजर्स आपले लास्ट सीन लपवू शकतात. सर्वात विशेष गोष्ट ही आहे की, लास्ट सीनवर सुद्धा कंट्रोल होईल म्हणजे तुमचा लास्ट सीन केवळ तेच लोक पाहतील ज्यांना तुम्हाला दाखवायचे आहे.

Advertisement

🔎 व्हॉट्सअ‍ॅपचे फिचर ट्रॅक करणारी WABetaInfo ने या नवीन फिचरची माहिती दिली आहे. या साईटने एक नवीन फिचरचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे. त्यानुसार, नवीन अपडेटनंतर लास्ट सीन डिसेबल करण्याची सुविधा मिळेल.

📍 2017 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने प्रायव्हसी पाहता My Contacts Except फिचर सादर केले होते आणि आता कंपनी हेच फिचर एक पाऊल पुढे घेऊन जात आहे. नवीन फिचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि सर्वांसाठी लाँच होण्यासाठी कोणतीही तारीख ठरलेली नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement